Maratha Reservation : द्वेषातून गुन्हे; माजलगावच्या पोलिस निरीक्षकांवर मनमानीचा आरोप, जरांगेंसमोर कैफियत

Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil Beed : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बीडच्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी कैफियत मांडली...
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News : जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या जाळपोळ व दगडफेक प्रकरणात दाखल गुन्ह्यांत निरपराधांना अडकविले जात आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून माजलगावमध्ये राजकीय द्वेषातून पोलिसांना नावे सांगितली जात आहेत. माजलगावच्या पोलिस निरीक्षकांकडूनही मनमानी करून अशा लोकांचा दुहेरी छळ केला जात असल्याची कैफियत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली.

आपण याबाबत गृहमंत्र्यांना बोलणार असून, निरपराधांना विनाकरण अडकविले, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असेही आपण सरकारच्या कानी घालू, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या; नांदेड जिल्ह्यात तरुणाने घेतले विष!

उपोषणानंतर तब्येत खराब असल्याने उपचार घेऊन मनोज जरांगे पाटील रविवारी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पोचले. समन्वयक व समाज बांधवांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आंदोलन, गुन्हे आणि सध्या सुरू असलेल्या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली.

जिल्ह्यात ता. ३० ऑक्टोबरला जाळपोळ, दगडफेकीच्या घटनांचे २५ गुन्हे नोंद झाले आहेत. माजलगाव, बीड, अंबाजोगाई, गेवराईत अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांत जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे ३०७ कलम लावण्यात आले आहे. या प्रकरणात कोणाचीही वैयक्तिक फिर्याद नसली तरी माजलगावमध्ये राजकीय द्वेषातून निरपराधांची नावे पोलिसांना दिली जात आहेत. माजलगावच्या पोलिस निरीक्षकांनाही या निमित्ताने ‘कुरण’ सापडल्याचा गंभीर आरोपही समन्वयकांनी केला.

माजलगावमध्ये ज्यांचा जाळपोळ व दगफेकीशी काहीही संबंध नाही, अशांची नावेही राजकीय मंडळींकडून पोलिसांना पुरविली जात आहेत. माजलगाव पोलिस या मंडळींच्या हातचे बाहुले बनून संशयितांची दुहेरी पिळवणूक करत आहेत. बीड शहर व ग्रामीण ठाण्यात दाखल गुन्ह्यांतदेखील पोलिसांकडून काही निरपराधांना अडविले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दरम्यान, याबाबत आपण गृहमंत्र्यांच्या कानी ही बाब घालणार आहोत. स्वत: जिल्ह्यात येऊन पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. निरपराध तरुणांचे भवितव्य अंधारात ढकलण्याचे पाप कोणी करू नये, त्याची समाजाशी गाठ असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. या वेळी अनिल जगताप, रमेशराव आडसकर, बी. बी. जाधव, मंगेश पोकळे, अशोक हिंगे, सुदर्शन धांडे, संतोष जाधव, किशोर गिराम, महेश धांडे, राहुल वायकर, अशोक सुखवसे, शिंदे, मस्के आदी उपस्थित होते.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : पालकमंत्री अतुल सावेंचे नाव काढताच जरांगे पाटील का भडकतात ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com