Maratha Reservation : 55 लाख कुणबी नोंदी सापडल्या मग दाखला का नाही? मनोज जरांगेंनी...

Manoj Jarange Patil News : नाशिकच्या विविध मराठा संघटनांच्या नेत्यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
Maratha Reservation Meeting
Maratha Reservation Meetingsarkarnama
Published on
Updated on

Nashik : मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मुंबईला जाण्याची तयारी देखील अंतिम टप्यात आहे. आपल्याला कुणबीमधून आरक्षण हवे ही मागणी कायम असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच सरकारच्या धोरणावर टीका करताना राज्यात 55 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मग या नोंदणीच्या आधारे नोंद सापडणाऱ्यांच्या वारसांना दाखल्यांचे वाटप का केले जात नाही, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Maratha Reservation Meeting
Gopichand Padalkar: शिंदेंनी घरकोंबडा व्हायचं का..."; उद्धव ठाकरेंवर पडळकरांचे टीकास्त्र

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी चर्चा व नियोजन याबाबत नाशिकच्या विविध मराठा संघटनांच्या नेत्यांनी मंगळवारी अंतरवलीसराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतली. नाशिक मधून अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने मराठा (Maratha) समाज मुंबईच्या आंदोलनात सहभागी होईल. आता कुठल्याही परिस्थितीत समाजातील युवक आणि कार्यकर्ते मागे येणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांच्या भेटीमध्ये आरक्षणाच्या (Reservation ) प्रश्नावर राज्यात मोठी जनजागृती झाली. या दबावातून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासन प्रमाणे प्रशासनाने ५५ लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. आता त्या वारसांना जातीचे दाखले देणे गरजेचे आहे. मात्र त्यात काही घटक पडद्यामागून अडथळे आणत आहेत. शासनही यावर अचानक संत झाल्याचे दिसते. ही अतिशय खेदाची बाब आहे. हा प्रश्न मुंबई येथे प्रकर्षाने मांडला जाईल राज्य शासनाला कोणत्याही परिस्थितीत या प्रश्नावर चालढकल करण्याची संधी मराठा समाज देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून या आंदोलनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. लाखाच्या संख्येत समाजबांधव मुंबईत दाखल होतील. ते आपल्या जेवणाची व्यवस्था करून येतील. जेवढे शक्य होईल तेवढे नाशिकच्या वतीने अन्य आंदोलकांसाठी भोजनासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाने दिले. यावेळी सुनील बागुल, चंद्रकांत बनकर, नानासाहेब बच्छाव, योगेश नाटकर, करण गायकर, शिवाजी सहाने, विलास पांगारकर, हर्षल पवार, निलेश ठुबे, ज्ञानेश्वर कवडे, वैभव दळवी, ज्ञानेश्वर सुराशे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com