Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईकडे दिंडीने रवाना होणार ; आंदोलकांसह नगरमध्ये मुक्कामी...

First stay in Nagar with Manoj Jarange and protester : सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार तयारी.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आरपारची लढाई मनोज जरांगे यांनी अंतिम टप्प्यात आणली आहे. बेमुदत उपोषणासाठी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक 20 जानेवारीला मुंबईकडे दिंडीने रवाना होणार आहे. या आंदोलकांचा मुक्काम नगरमध्ये होणार आहे.

या मुक्कामाचे नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार तयारी सुरू असून, नगरकरांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक अंतरवली सराटी येथून 20 जानेवारीला मुंबईकडे दिंडीने रवाना होणार आहे. या आंदोलकांचा मुक्काम बाराबाभळी (ता. नगर) येथे 21 जानेवारीला होणार आहे.

Manoj Jarange
Uddhav Thackeray PC : ठाकरेंची महापत्रकार परिषद; 'नार्वेकरांच्या निकालाची 'चिरफाड' करणार...'

या मुक्कामाच्या नियोजनाची तयारी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथे दुपारचे जेवण झाल्यानंतर पुढे आंदोलक नगर तालुक्यातील बाराबाभळी येथे रात्री मुक्कामी येणार आहेत. यानंतर 22 जानेवारीला सुपा (ता. पारनेर) मार्गे आंदोलक रांजणगाव येथे मुक्कामी असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरमध्ये प्रवेश केल्यानंतर आंदोलकांच्या नियोजनाची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. जेवण, पाणी, मुक्कामी रात्रीच्या झोपण्याची सोय, मुलभूत सुविधांसाठी समित्यांची स्थापना करण्यात आल्या आहेत. बाराबाभळी येथे मुक्कामाच्या सोयीसाठी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतल्याची माहिती गोरख दळवी यांनी दिली.

तब्बल 25 लाख आंदोलकांची जेवणाची सोय करावी लागणार आहे. या आंदोलकांच्या सेवेला नगरमधून प्रतिसाद मिळत आहे. औषधोपचारासाठी नगर मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मुक्कामीस्थळी आंदोलकांना कोणतीही अडचण न येता मुलभूत सुविधा देण्यासाठी विविध स्तरातील नागरीकांनी पुढाकार घेतला आहे.

नगरीकांना आवाहन

मराठा आरक्षणाची लढाई कोणत्याही समाजाविरोधात नाही. पायी निघालेला हा मोर्चा सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. हा मोर्चा नगरमध्ये मुक्कामी आहे. या सेवेत प्रत्येक नगरकरांनी योगदान देण्याचे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. यावेळी गोरख दळवी, राम जरांगे, मदन आढाव, गजेंद्र दांगट उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

Manoj Jarange
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना 'ग्रीन सिग्नल'; पण ठेवली मोठी अट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com