Maratha Reservation : भुजबळ 'पिऊन' बोलतायेत काय?; मराठा महासंघाची खोचक टीका

Maratha Obc Reservation Maratha Mahasangh On Chhagan Bhujbal : आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद सुरू आहे. आता मराठा महासंघाने मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे...
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation In Maharashtra : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण करत मोठे आंदोलन उभे केले. सरकारनेही जरांगे यांच्या आंदोलनाचा धसका घेतल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर थोड्याच दिवसांत जारांगेच्या ओबीसीमधून सरसकट समावेशाला ओबीसी समाजातून विरोध सुरू झाला. यात मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. सध्या आरक्षण मागणी सोबतच जरांगे-भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. याच अनुषंगाने आता मराठा महासंघाने भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Chhagan Bhujbal
Maratha Reservation : ''मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही''

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ हे प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही, हे सांगतानाच जरांगे यांच्या ओबीसीतूनच सरसकट मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या मनोज जरांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत एकेरी उल्लेख करत टीका केली जात आहे.

भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एव्हढ्या वर कोणी नेले, असे म्हणत बोचरी टीका केली होती. यानंतर आता अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नगरमध्ये पत्रकार परिषद घेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांना खरमरीत शब्दात नावले.

सध्या राजकारण्यांची भाषा खालावत चालली आहे. भुजबळ जी भाषा वापरत आहे ती सध्या चुकीची आहे. ते सगळे चुकीचे बोलत असून ते काय 'पिऊन' बोलत आहेत की काय अशी शंका येते, अशी खोचक टीका यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात होणार आहे. याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी या आशयाचे पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे. तसेच कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवा. परंतु आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच द्या, अशी मागणी यावेळी मराठा महासंघाने केली आहे.

वाद आणि संघर्षाला भुजबळ यांची वक्तव्ये कारणीभूत!

मराठा आरक्षण व ओबीसी यांच्यामध्ये सध्या जो वाद सुरू आहे, याला कारणीभूत छगन भुजबळ आहे. भुजबळांनी याला सुरुवात केली आहे. सभेला पैसे कोठून आले कसे आले हे भुजबळांनी सुरू केले. भुजबळ हे अनुभवी नेते असताना त्यांनी यामध्ये पडायला पाहिजे नव्हते. तुम्ही जे भाष्य करत आहात ते थांबवा व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशी भाष्य करू नका. आरक्षणाबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो सरकार घेईल. उद्या जर आरक्षणाबाबत निर्णय झाला तर भुजबळ काय राजीनामा देणार आहे का? असा सवाल महासंघाचे दिलीप जगताप, संभाजी दहातोंडे यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil : 'मराठा समाजाला शांतच राहुद्यात, डिवचाल तर सरकारला जड जाईल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com