Maratha Reservation News : " खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्याचा इलाज..."; महाजनांचा खोचक पलटवार

Girish Mahajan News : आंदोलकांनी संयम ठेवावा
Girish Mahajan and Eknath Khadse
Girish Mahajan and Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद अधिकच पेटत चालला आहे. राम मंदिरासाठी जेलमध्ये असल्याच्या वक्तव्यावरुन या दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. खडसे यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यावर महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. खडसे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांचा इलाज मलाच करावा लागणार असल्याचे महाजन म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यापूर्वी आपण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. सरकारची भूमिका त्यांच्याकडे मांडलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेले आहे, असे भाजप नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने अधिक मुदत मागितली आहे. या मुदतीबाबत आंदोलक जरांगे-पाटील आणि राज्य शासनात मतभेद आहेत. त्यावरून वाद देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर मराठा आंदोलकांनी पुढील टप्प्यातील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

ग्रामविकास मंत्री महाजन यांनी शुक्रवारी भूमिका मांडली. ते म्हणाले, यापूर्वी आपण याबाबत स्पष्टपणे बोललो आहे. शासनाची भूमिका वारंवार मांडली आहे. त्यामुळे आत्ता देखील सांगत आहे, की जरांगे-पाटील यांच्यावर पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan and Eknath Khadse
Sunil Kedar : पुणे,चंद्रपूरनंतर आता सावनेरच्या पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह? केदारांची आमदारकी गेल्याने चर्चेत

ते म्हणाले, त्यांच्यावर मुंबईला येण्याची वेळ येणारच नाही. कारण मधल्या काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. राज्य शासन त्यावर काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यातील सुनावणीची देखील तारीख आहे. न्यायालयात याबाबत लवकर निर्णय होईल. एखादा आठवडा मागे पुढे होईल, पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, हे नक्की आहे. फक्त त्यांनी थोडी वाट बघावी. महाजन यांनी मराठा आंदोलक मुंबईत आले तर, मुंबई शहरातील व्यवस्थेवर त्याता परिणाम होईल, असे स्पष्ट केले.

ते म्हणाले, आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात वाहने आणली तर मुंबई शहरातील वाहतूक तसेच अन्य व्यवस्था बिघडेल. त्यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जरांगे-पाटील यांच्यात चर्चा होणार का? फडणवीस जरांगे-पाटील यांच्या घरी जाणार का? याबाबत, महाजन यांनी तशी वेळच येणार नाही. मराठा आरक्षणाचे श्रेय फक्त जरांगे यांनाच आहे. अन्य कोणी क्रेडिट घेण्याचा प्रश्नच नाही. फक्त त्यांनी थोडा संयम ठेवावा, इतके मोठे आंदोलन केले आहे, त्याला वेगळे वळण लागता कामा नये, अशी आमची अपेक्षा आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Girish Mahajan and Eknath Khadse
Loksabha Elecction : मोठी बातमी !लोकसभेसाठी महायुतीचा 'हा' फॉर्म्युला ठरला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com