Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यासाठी महायुती व इंडिया आघाडी आतापासूनच कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जागावाटपावर चर्चा करण्यात आली.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीकडे सध्या असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात महायुतीमधील कुठल्या पक्षाचा प्रभाव अधिक आहे. त्या पक्षाला ती जागा सोडण्यात येणार आहे. याचा तीनही पक्षाकडून सर्वे करण्यात येणार आहे या सर्वेनुसार ज्या पक्षाचा प्रभाव जास्त त्या पक्षाला जागा सोडण्यात येणार आहे.
या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीमधील भाजप 24, शिवसेना शिंदे गट 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (ajit Pawar) गटाला 10 जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. या फॉर्म्युलावर तीनही पक्षात जवळपास एकमत झाले आहे. येत्या काळात सर्वे आल्यानंतर मतदारसंघ कुठले असणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या काळात या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा जागा मिळाव्यात यासाठी महायुतीमधील अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत जोरात चर्चा
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत सामील होईल, अशी चर्चा जोरात रंगली आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याशी राज ठाकरे यांची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज ठाकरे यांच्याशी तब्बल सहा वेळा भेट झाली आहे. त्यामुळे सध्या चर्चा जोरात सुरु आहे.