Maratha Reservation News : मराठा आंदोलन आक्रमक; तर...तहसीलच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन करणार

Ahmednagar Maratha Aandolan News ; मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यानंतर ही शासनाने दखल न घेतल्यास तहसील कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर किंवा अधिकाऱ्यांच्या दालनात बसून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी आज नगर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेतली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाजाची आंदोलन तीव्र केले आहे. अन्न त्याग आंदोलन सुरू झाले असल्याने शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आल्याची भूमिका मांडली. प्रत्येक आंदोलनाची दखल शासन घेत आहे. त्याचा अहवाल आम्ही तातडीने शासनाकडे सादर करत आहोत. शासन यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी 'सरकारनामा"शी बोलताना सांगितले. या वेळी तहसीलदार संजय शिंदे हेदेखील उपस्थित होते.

Maratha Reservation News
Maratha Reservation : रोहितदादांनी संघर्ष यात्रा थांबवली, अजितदादांनी गाळपाला जाणे टाळले; आता शरद पवार त्याला जाणार का?

आंदोलक गोरख दळवी म्हणाले, "आजपासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. प्रांताधिकारी प्रशांत पाटील या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आले होते. त्यांना आम्ही माहिती दिली", मात्र, शासनाने मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेतल्यास उद्यापासून उग्र आंदोलन सुरू करणार आहोत. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून घेणार आहोत. वेळप्रसंगी जिल्ह्यातील प्रथम वर्ग अधिकारी यांच्या दालनामध्ये बसून घेऊ. या आंदोलनाचे पडसाद तीव्र असतील, असा इशारा गोरख दळवी यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी गोरख दळवी, श्रीपाद दगडे, संतोष अजबे, नवनाथ काळे, अमोल हुंबे पाटील, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रकाश फिरोदिया उपस्थित होते.

...अन् त्या पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला!

'ओबीसी'मधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेणारा एक पदाधिकारी नगर तहसील कार्यालयातील मराठा आंदोलनाकाच्या व्यासपीठावर आज सकाळी आला होता. या कार्यकर्त्याला आंदोलकांनी मज्जाव केला. आंदोलकांची भावना लक्षात आल्यानंतर या कार्यकर्त्यांनीही तेथून काढता पाय घेतला.

Edited by : Amol Jaybhaye

Maratha Reservation News
Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com