Nashik News : मराठा आरक्षणासाठी लढा पुकरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला डेडलाइन दिली आहे. यामुळे आता सरकार आरक्षणाच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत कुणबी नोंदी शोधण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. (Latest Marathi News)
नाशिक या एकाच जिल्ह्यामध्ये १ लाख ४३ हजार ९५६ कुणबी-मराठा नोंदी आढळून आले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८३ लाख ६४ हजार ८६५ दस्तावेज तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये नोंदीच्या शोधमोहीम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर दस्तावेज तपासण्याचं का सुरू आहे.
सन १९४८ पूर्वीच्या आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील दोन टप्प्यांत कुणबी-मराठा नोंदीचा शोध घेण्यात येत आहे. यामध्ये १९४८ पूर्वीच्या १ लाख १२ हजार ४८९ नोंदी आढळून आल्या आहेत. १९४८ ते १९६७ या टप्प्यात ३१ हजार ४६७ नोंदी आढळलेल्या समोर आल्या आहेत. कुणबी एक नोंद जवळपास शंभर जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देईल, असे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.