Navi Mumbai ASI death : पोलीस दलात खळबळ! DCP, ACP वर आरोप करत उपनिरीक्षकाने केला शेवट

Navi Mumbai Police ASI Death Case : पी. एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्येही काही अधिकाऱ्यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
Navi Mumbai Police ASI Death | P N Patil Case
Navi Mumbai Police ASI Death | P N Patil CaseSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News, 06 Sep : नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. रबाळे परिसरातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पी. एन. पाटील यांनी ऐरोली येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस विभागाचे ACP गिरीष ठाकरे आणि आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

पी. एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्येही काही अधिकाऱ्यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

Navi Mumbai Police ASI Death | P N Patil Case
Dhananjay Mahadik : कृष्णराज महाडिक भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष की युवक काँग्रेसचे? वडील धनंजय महाडिक यांचं वक्तव्य चर्चेत

पोलिसांनी घटनास्थळावरून कथित सुसाईड नोट आणि मोबाईल ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेले आरोप आणि त्यातील अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com