

MVP Private University News : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. विशेष सर्वसाधारण सभेला झालेली हजारोंची गर्दी आणि गोंधळ त्याचे प्रतीक होते. त्यामुळे या सभेत सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय देखील घेतला.
मविप्र (मराठा विद्या प्रसारक संस्था) राज्यातली रयत शिक्षण संस्थेनंतरची मोठी संस्था आहे. या संस्थेच्या वार्षिक सभेत राजकीय वाद आणि गोंधळ ही परंपरा आहे. मात्र रविवारची सभा अत्यंत कौशल्याने हाताळून अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी एक वेगळा संदेश दिला.
या सभेच्या तयारीसाठी सत्ताधारी ॲड. नितीन ठाकरे आणि विरोधक श्रीमती नीलिमाताई पवार या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली होती. दोघांनी सभासदांच्या पूर्व सभा घेऊन वातावरण तापविले होते. निवडणुकीआधीची सभा असल्याने हजारो सभासदांची गर्दी झाली होती.
यावेळी सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सव्वा दोन तास प्रास्ताविक करून वेगळा विक्रम केला. आपल्या कार्याचा आढावा सादर करताना विक्रमी कामकाज व शैक्षणिक प्रगती साध्य केल्याचा दावा केला. विरोधकांच्या तुलनेत सरस कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. (Nashik News)
या बैठकीत गेल्या वर्षापासून गाजत असलेला खाजगी विद्यापीठ हा महत्त्वाचा व सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय होता. मागच्या बैठकीत सभासदांनी त्यांना विरोध केला होता. मात्र इतिवृत्तात हा विषय स्थगित असा त्याचा उल्लेख होता. त्यामुळे विरोधक पुन्हा इरेला पेटले होते.
या बैठकीत गेल्या वर्षापासून गाजत असलेला खाजगी विद्यापीठ हा महत्त्वाचा व सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय होता. मागच्या बैठकीत सभासदांनी त्यांना विरोध केला होता. मात्र इतिवृत्तात हा विषय स्थगित असा त्याचा उल्लेख होता. त्यामुळे विरोधक पुन्हा इरेला पेटले होते.
निवडणुकीआधीची सभा असल्याने सत्ताधाऱ्यांनी राजकीय तजबीज करीत विरोधकांना नामोहरम करण्याचा डाव टाकलाच. दहा वर्षांपेक्षा अधिक सेवाकाळ असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर अन्य कर्मचाऱ्यांनाही वेतन वाढ देण्याचा निर्णय घोषित केला. या निर्णयाने कर्मचारी आणि सभासदांना खुश केले.
यावेळी माजी संचालक सचिन पिंगळे यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली नसल्याने आक्षेप नोंदवला. प्रणव पवार यांचं विविध सदस्यांनी कामकाजाविषयी गंभीर आक्षेप नोंदवले. त्याला सरचिटणीस ठाकरे यांनी तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर दिले.
या सभेनंतर माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांचं विरोधी गटाने पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर सभेत बोलू दिले नाही यांसह विविध तक्रारी केल्या. संस्थेत इंटरनल फॉरेन सिक ऑडिट करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारीनिशी सभा झाल्याने निवडणुकीतील संघर्षाची चाहूल लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.