जळगाव : (Jalgaon) महापौर जयश्री महाजन (Jayshee Mahajan) यांनी नोव्हेंबर महिन्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाला कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट दिले होते. ती कामे झाली किंवा नाही आणि झालेली नसतील, तर त्याचे कारण काय, याचा सविस्तर आढावा गुरुवारी घेण्यात येणार आहे. (Mayor will take administration review of pending work and target)
महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात सकाळी अकराला बैठक होणार आहे. ही बैठक विभागनिहाय होणार असून, त्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्यांना सुटी देऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.
महापौर जयश्री महाजन यांनी २२ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी अकरापासून, तर सायंकाळी सहापर्यंत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी तत्कालीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट दिले होते.
या कामांची आपण पूर्तता करून अहवाल तयार करावा, असेही त्यांना सांगितले होते. त्यानुसार आता दोन महिने पूर्ण होत असून, त्या सर्व कामांचा आढावा प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कामाचा लेखी अहवाल आहे, तसेच कामे का झाली नाहीत, याचाही तपशील मागविण्यात आला आहे. अशा प्रकारची बैठक महापालिकेत प्रथमच होत आहे. त्यामुळे दिलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांचे काय उत्तर असेल, याकडेच आता लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.