Ramtek Lok Sabha : निवडणूक कोण जिंकणार? वादातून हाणामारी, तरुणाने गमावला जीव

Lok Sabha Election 2024 : रामटेक मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध काँग्रेसची लढत होत आहे. काँग्रेसने श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती.
Ramtek Lok Sabha
Ramtek Lok Sabhasarkarnama

Ramtek Lok Sabha : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मतमोजणी चार जूनला होणार आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोणाला लागणारे, हे चार जूनलाच कळेल. मात्र, उमेदवारांचे समर्थकांमध्ये कोण जिंकणार याच्या पैजा लागत आहेत. गावातील पारापारावर निकालाच्या अंदाजाबाबत चर्चा झडत आहेत. मात्र, विदर्भातील रामटेक मतदारसंघात कोण जिंकणार यावरून नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात पारावर होणाऱ्याचे चर्चेचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला.

रामटेक मतदारसंघात Ramtek Lok Sabha शिवसेना (ठाकरे गट) राजू पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत होत आहेत. या दोघांपैकी कोण जिंकणार याची चर्चा सिंगारखेडा गावातील पारावर सुरु होती. मात्र, या चर्चेत वादाची ठिणगी पडली आणि हाणामारी झाली. या मारहाणीत सतीश फुले या तरुणाला मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रवीण बारडे याला अटक केली आहे.

Ramtek Lok Sabha
Lok Sabha Election Analysis: 258 जागांवर मतदानांची टक्केवारी घसरली! आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्र अन् गुजरात...

रामटेक मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध काँग्रेसची Congress लढत होत आहे. काँग्रेसने श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. मात्र, काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे निवडणूक रिंगणात होते. शिंदे गटासोबत भाजपने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघाची विदर्भात मोठी चर्चा आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

निवडणुकीच्या निकालाबाबत राजकीय पक्षाचे, उमेदवाराचे समर्थक पैजा लावत आहेत. सोशल मीडियावर स्टेट्‍स ठेवत विरोधकांना आव्हान देत आहेत. त्यामुळे किरकोळ भांडणाच्या घटना काही ठिकाणी घडल्याचे सांगितले जात आहे. सिंगारखेडामध्ये सतीश फुले या तरुणाला जीवच गमावाव लागला. सांगलीत निवडणुकीची पैज लावणाऱ्यांवनर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तशीच कारवाई विदर्भात पैज लावणाऱ्यांवर देखील होणार का? असे विचारले जात आहे.

Ramtek Lok Sabha
Kerala Lok Sabha 2024: डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com