Sujay Vikhe : तीन कुटुंबांना सुजय विखे विमानातून घडवणार अयोध्यावारी...! व्हाॅट्सअॅपवर आलेल्या...

Mere Ghar Aaye Ram Competition : स्पर्धा जिंकणाऱ्यांना स्वखर्चाने अयोध्येला विमानाने नेणार आणि प्रभू श्रीराममूर्तीचे दर्शन घडविणार आहे.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Sujay Vikhe : अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने भाजपच्या मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडून विविध प्रकारचे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहेत. नगरचे खासदार सुजय विखे यांनी यानिमित्ताने 'मेरे घर आए राम' ही स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना खासदार विखे स्वखर्चाने अयोध्येला विमानाने नेणार आणि प्रभू श्रीराममूर्तीचे दर्शन घडविणार आहेत.

खासदार विखेंनी जाहीर केलेल्या या स्पर्धेची देशभर चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि विखे परिवाराकडून नगर जिल्ह्यात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्ताने साखर आणि डाळवाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. नगर (Nagar) शहरातील प्रभाग नऊमध्ये आज हा कार्यक्रम झाला. भाजपचे शहर-जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालन ढोणे, ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.

Sujay Vikhe
Rajni Devi Patil Passed Away: खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

या कार्यक्रमानिमित्ताने खासदार विखे यांनी या स्पर्धेची घोषणा केली. ही स्पर्धा संपूर्ण नगर शहरासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही स्पर्धा 'मेरे घर आए राम' अशी असणार आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराममूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात आम्ही ही स्पर्धा घेणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी आम्ही एक व्हाॅट्सअॅप क्रमांक देणार आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढून पाठवायची आहेत. या सर्वांचे अवलोकन आम्ही करणार आहोत. यातील प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढणार आहोत.

स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला घेऊन जाणार आहेत, असे सांगितले.

प्रसादाच्या लाडूसाठी भरला दम...

विखे कुटुंबीयांकडून ही साखर आणि डाळ 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या प्रसादाच्या लाडूसाठी दिली जात आहे. लाडू तयार केले की नाही, हे तपासण्यासाठी माझी यंत्रणा येणार आहे.

तुम्हाला माहीत आहे की, देशात आणि नगर जिल्ह्यात विखे यंत्रणा कशी आहे ते, जो कोणी लाडूचा प्रसाद बनवणार नाही, त्याची यादी तयार करून मी अयोध्येला घेऊन जाणार. प्रभू श्रीरामाच्याचरणी ती यादी ठेवणार, यांनी साखर अन् डाळ घेऊनदेखील प्रसादाचा लाडू बनवला नाही, यांचा बंदोबस्त तूच बघ, असे सांगणार. मग हे परवडणार नाही. ते तुम्हाला झेपणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी खासदार सुजय विखे यांनी करताच कार्यक्रमस्थळावर हशा पिकला.

(Edited by Amol Sutar)

R...

Sujay Vikhe
Supreme Court : निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून सरन्यायाधीश का बाहेर, केंद्राला फटकारले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com