Rajni Devi Patil Passed Away: खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

Rajni Devi Patil Passed Away:रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
Rajni Devi Patil
Rajni Devi PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara News: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवारी (दि.12 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रजनीदेवी पाटील यांचा जन्म 26 जुलै 1948 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. 16 मे 1968 रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्याशी विवाह झाला.

Rajni Devi Patil
Ajit Pawar : प्रतापगडाबाबत अजितदादांचा सातारकरांना मोठा शब्द; म्हणाले...

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम साथ दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रोत्साहन देणाऱ्या 'माई'

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या रजनीदेवी पाटील यांना सर्वजण 'माई' या नावाने ओळखत असत. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. त्या उच्चशिक्षित होत्या.

जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी त्या अत्यंत आपुलकीने वागत असत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Rajni Devi Patil
Khatav News : उरमोडीच्या पाण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतले कोंडून; प्रशासनाची उडाली तारांबळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com