Maharashtra Congress: महाराष्ट्रात लवकरच काँग्रेसचा मोठा धमाका; नाना पटोलेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Nana Patole : महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या घडामोडी घडणार ? राहुल गांधींच्या उपस्थितीत...
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसही महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली करत आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती राज्यातील काँग्रेसचे नेते काँग्रेस हायकमांडला देत असतात.

अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला गेले आहेत. या वेळी नाना पटोले यांनी मोठा दावा केला असून, राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. "महाराष्ट्रातून मोठे प्रवेश होणार आहेत. राहुल गांधी यांची वेळ घेत ते प्रवेश होतील, प्रवेश कोणाचे आहेत ते तुम्हाला लवकरच समजेल," असे पटोले म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole
Shivsena Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी संधी; अनेक नवे चेहरे आले समोर

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर नाना पटोले हे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर होते, तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आदरांजली वाहिली. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, "आज केसी वेणुगोपाल व जयराम रमेश यांची भेट घेतली आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मी आलो होतो. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. याबाबत आज चर्चा झाली. आमची जोरदार तयारी झालेली आहे. याबरोबरच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातदेखील काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होणार आहेत. यासाठी राहुल गांधी यांचा वेळ घेत आहोत. हे प्रवेश कुणाचे होतील, हे तुम्हाला लवकर कळेल", असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. यानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. सध्या राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये तर एक गट विरोधी पक्षात आहे. यातच आता नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा केल्यामुळे नेमकी कोणते मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Edited by : Ganesh Thombare

Nana Patole
Solapur Sugarcane Politics : शेतकऱ्यांची काळजी की मतांची बेगमी ? सोलापुरात ऊसदरासाठी कारखानदारांची स्पर्धा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com