Milk Rate News: मंत्री विखेंच्या मतदारसंघात दूध उत्पादक आक्रमक; दरवाढीसाठी आंदोलन

Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
Milk Rate News
Milk Rate NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: दूध दरवाढीवर नगर जिल्ह्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राज्याचे पशुसंवर्धन तथा दुग्धविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुका दूध उत्पादक कृती समिती दूध दरवाढीवर आक्रमक झाली आहे. शिर्डी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. दूध उत्पादक कृती समितीने दुष्काळ आणि दूध दरवाढीकडे सरकारचे लक्ष वेधले.

नगर जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याशिवाय चाराटंचाईचेदेखील संकट उभे राहू लागले आहे. यात दुधाला भाव नाही. दूध उत्पादनाचा खर्चदेखील निघत नाही. या स्थितीत राज्य सरकारने दुधाचे दर कोसळत असलेल्या दराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

खासगी दूध संकलन केंद्राने राज्य सरकारचा 34 रुपयांचा दूध दर असताना तो 25 ते 26 रुपयांवर आणला आहे. परंतु पॅकिंग दूध आणि धान्य पदार्थाचा भाव 80 ते 100 रुपये आहे. दुधापासून इतर उपपदार्थ तयार केले जातात. त्यांना भाव मिळतो, परंतु दुधाला नाही, अशी परिस्थिती आहे. दुधाला किमान 50 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, अशी मागणी राहाता तालुका दूध उत्पादक कृती समितीने केली.

Milk Rate News
MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी विरोधकांकडे मागितला गेल्या तीस वर्षांचा हिशोब; म्हणाले...

राहाता दूध उत्पादक कृती समितीने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव प्रतिलिटर 50 रुपये मिळावा, पशुखाद्याचे दर 30 रुपयांनी कमी करावेत, पशूंवर उपचारासाठी लागणारे औषधांचे दर कमी करावेत, औषधांवरील जीएसटी रद्द करावा, दुग्धजन्य पदार्थांची आवक-जावक दर दहा दिवसाला सार्वजनिक करावी, अशा विविध मागण्यांकडे राहाता दूध उत्पादक कृती समितीने लक्ष वेधले. दूध उत्पादक समितीचे विठ्ठलराव शेळके, भगवानराव टिळेकर, राजेंद्र बावके, भास्करराव मोटकर, भिनानाथ पाचारणे, अनिल बोठे, सचिन चौगुले, नानासाहेब खरात, कैलास आभाळे आंदोलनात सहभागी झाले होते.

दूध भेसळ रोखा

नगर जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रकार वाढले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून यावर नियंत्रण नाही. दूध भेसळ रोखण्यास प्रशासन कमी पडत आहे. दूध भेसळीचा परिणाम मूळ दूध उत्पादकांबरोबर मानवाच्या थेट आरोग्यावर होतो. दुधाची गुणवत्ताचे निकष कडक करावेत. दूध भेसळीची कारवाई संपूर्णपणे इन कॅमेरा करण्याची मागणी राहाता दूध उत्पादक कृती समितीने केली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Milk Rate News
Radhakrishna Vikhe : आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर जरांगे, भुजबळांना उद्देशून विखेंचं विधान, म्हणाले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com