Matin Patel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हाजीर हो...; SIT ने समन्स पाठवल्याने अडचणी वाढल्या, लवकरच नाशिक दौऱ्यावर

Nashik SIT Summons on MIM Corporator Matin Patel : नाशिक TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरुन एसआयटीने आता एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना समन्स बजावला आहे.
Nida Khan, Matin Patel
Nida Khan, Matin PatelSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नाशिकमधील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैगिंक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणात निदा खान फरार असताना एसआयटीचे विविध पथके तिचा शोध घेत होती. निदा खान तब्बल ४० दिवस पोलिसांच्या हाती लागली नव्हती. तपासादरम्यान ती छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असल्याचे उघड झाले असून, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.

त्यानंतर मतीन पटेल यांच्या घरावर व कार्यालयावर स्थानिक पालिका प्रशासनाने कारवाई केली होती. महापालिकेने पटेल यांच्या संभाजीनगरमधील घरावर बुलडोजर कारवाई करत ते उद्द्वस्त केले होते. आता याप्रकरणात नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) पटेल यांना सोमवारी (दि. २५) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nida Khan, Matin Patel
Matin Patel News : MIM च्या मतीन पटेल यांच्या नगरसेवकपदावर वरवंटा फिरणार? काय असते पद रद्द करण्याची प्रक्रिया? सविस्तर समजून घ्या!

नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून निदा खानसह तौसिफ अत्तार व दानिश शेख यांच्याविरोधात अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तौसिफ अत्तार व दानिश शेख यांना अटक केली होती. मात्र निदा खान पसार झाली होती.

एसआयटीच्या पथकाने निदा खानला अटक केल्यानंतर तिला आश्रय दिल्याच्या आरोपात मतीन पटेल यांनाही सहआरोपी करत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देणारी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे मतीन पटेल हे नाशिकला चौकशीसाठी हजर राहू शकता.

सध्या निदा खान न्यायालयीन कोठडीत असून तिच्या जामीन अर्जावर येत्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात एसआयटीने १५०० पानांचे आरोपपत्र दोन दिवसांपूर्वीच न्यायालयात दाखल केलं.

Nida Khan, Matin Patel
Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं भोवलं; MIM नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर, कार्यालयावर चालवणार बुलडोझर

फरार असताना निदा खानला आश्रय देण्यात आला होता. यासंदर्भात मतीन पटेल यांचे नाव समोर आले. निदा खान आणि मतीन पटेल यांच्यात संपर्क कसा झाला. तिला आश्रय देण्यामागील नेमके कारण काय होते. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणात मतीन पटेल यांना लवकरच एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com