Sudhakar Badgujar Politics: शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात गोळीबाराचा गुन्हा?

Shivsena UBT Politics, MP Raut's criticism of the state government, false crimes against Shiv Sena leaders?-सत्ताधारी पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
Deepak Badgujar
Deepak BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सातत्याने चर्चेत असतात आक्रमक संघटक म्हणून ते परिचित आहेत पोलिसांकडून त्यांना यापूर्वी देखील काही गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.

दोन वर्षांपूर्वी शहरातील सिडको भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता. त्याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यात दोन वर्षे फारसा तपास झालेला नव्हता. आता अचानक त्याच्या तपासात पोलिसांनी गती आणली आहे.

आता अचानक गेल्या दोन आठवड्यात पोलिस सक्रीय झाले होते. याबाबत सहा जणांना अटक कात्यांनी दिलेल्या माहितीत दीपक बडगुजर यांनी पैसे दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याबाबत आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यातील एका संशयीताने आपल्या जबाबात दीपक बडगुजर यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संदर्भात शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी या प्रकरणाबाबत गंभीर आरोप केला होता. याबाबत खासदार राऊत यांनी राज्य सरकार आणि सध्याच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी पक्षाने शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक तयारीचा धसका तर घेतला नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

Deepak Badgujar
Hiraman Khoskar Politics: आमदार खोसकरांच्या रस्ते विकासावर सरपंचांचेच प्रश्नचिन्ह, केला रास्ता रोको!

खासदार राऊत शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने सांत्वनासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी हा खळबळजनक आरोप केला होता. ते म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वीच्या आणि त्याच्याशी शिवसेनेचे बडगुजर यांचा काहीही संबंध नाही अशा गुन्ह्यात त्यांना अडकवण्याचे डावपेच सुरू आहेत.

यासाठी पोलीस यंत्रणेवर प्रचंड राजकीय दबाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अटक केलेल्या संशयीतांवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला आहे. तपासामध्ये त्यांनी आपल्या सोयीचे जबाब द्यावे, असे पोलीस अधिकारी त्यांना बजावत होते, असा आरोप होत आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या दबाबाच्या माध्यमातून संबंधित संशयीतांकडून श्री बडगुजर यांच्या कुटुबियांच्या विरोधात खोटी माहिती मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. याबाबत अतिशय विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले होते.

Deepak Badgujar
Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal : 'हनुमान चालीसा'चा आवाज..; राऊतांनी भुजबळांना सुनावलं, तर राणांना खोचक टोला

या दौऱ्यात शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी सत्ताधारी पक्षाडून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना कसा त्रास दिला जात आहे, याची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने शहरातील राजकारण आणि गुन्हेगारी यांची गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.

त्यानंतर लगेचच आज दुसऱ्याच दिवशी जिल्हाप्रमुख बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. चार दिवसांपूर्वी पुणे येथून अटक केलेल्या आरोपीने आपल्या जबाबात श्री. बडगुजर यांचे नाव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com