Jalgaon News : राष्ट्रवादी काँगेसच्या दोन्ही गटांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. दोन्ही गटांनी जळगाव जिल्हा प्रभारीची नावे जाहीर केली आहेत. अजित पवार गटातर्फे खान्देशची जबाबदारी मंत्री अनिल पाटील यांना तर शरद पवार गटातर्फे एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आल्याने, दोघांमध्ये खरा सामना होणार आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडून आलेल्या फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना राज्याचे मंत्रीपदही मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. शरद पवार गटाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. (NCP Crisis News)
अजित पवार गटाची राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी जाहीर करण्यात आली, त्यात जळगांव, धुळे, नंदुरबार हा खानदेश भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर शरद पवार यांच्या गटातर्फे जिल्हा प्रभारी यादी जाहीर करण्यात आली, त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कडे जळगांव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे.
या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट करावयाचा आहे. त्यांचा आता खऱ्या अर्थाने कसं लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकेकाळी भारतीय जनता पक्षात होते, त्या वेळी ते एकमेकांचे अत्यंत निकटचे मानले जात होते. अनिल पाटील यांना त्याकाळात खडसे यांच्या गटाचे मानले जात होते. आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर खानदेशात आता दोघांचा सामना होणार असून, त्यांनी एकमेकांविरुद्ध तोफ डागणे सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे वर्चस्व दिसून येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.