Atul save confusion : सभापती गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावेंची चुक लक्षात आणून दिली!

राजपूत भामटा समाजाच्या प्रश्नासंबंधीच्या छापील उत्तर आणि निवेदनातील विसंगतीने उडाला गोंधळ
Atul Save & Nilam Gorhe
Atul Save & Nilam GorheSarkarnama
Published on
Updated on

ST cast issue news: मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राजपूत समाजाच्या नावाबाबत घोषणा केली होती. त्याची कार्यवाही झाल्यास अनुसूचित जाती व जमातीच्या घटकांवर अन्याय होईल, याबाबत सदस्य राठोड यांनी लक्षवेधी मांडली होती. (Minister Atul save given a defferent answer and information On ST Issue)

याबाबत इतर मागासवर्ग (OBC) बहुजन समाज विकास मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी राठोड यांच्या लक्षवेधीला उत्तर दिले. याबाबत त्यांनी छापील उत्तर आणि प्रत्यक्ष उत्तर यात मोठी तफावत आढळल्याने त्यांचा गोंधळ झाला.

Atul Save & Nilam Gorhe
Breaking News : खडसेंनी फैलावर घेताच...झाली केळी महामंडळाची घोषणा!

सदस्य राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील जवळपास तीन कोटी अर्थात बारा टक्के लोकसख्या असलेल्या भटक्या विमुक्त आणि विविध घटकांतील पाचशे जातींच्या नागरिकांवर अन्याय होईल. अनुसूचीत जाती, जमातीचे लोक मागास तर राजपूत हे राज्यकर्ते व प्रगत आहे. हे लक्षात घेऊन नावात बदल करू नये अशी सुचना केली.

यावर निवेदन करताना मंत्र्यांनी अनुकूलता दाखवली. याबाबत संबंधीत विषयाचा पुरेसा अभ्यास करून भटक्या विमुक्तांच्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, असे आश्वासीत केले.

Atul Save & Nilam Gorhe
Satara News : आमदार स्टीकर लावून फिरतात नातेवाईक; कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मात्र हे करताना लीखीत उत्तर मात्र अगदी विपरीत होते. त्यात नावात सुधारणा करण्यासाठी दुरूस्ती करून ते केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल असे होते. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी ते लक्षात आणून दिले. त्यानंतर मंत्र्यांचाही गोंधळ झाला. ते कागदपत्र शोधू लागले. त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

यावेळी सभापती यांनी उत्तरातील तफावत मंत्री सावे यांच्या लक्षात आणून देत, हे उत्तर राखून ठेवायचे का?. हवे तर याबाबत आपण नंतर हा विषय घेऊ. असे सांगत त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही मंत्र्यांचा गोंधळ कमी होत नव्हता. शेवटी त्यांनी सभागृहाला सुचीत करून हे उत्तर नंतर सादर करण्यास मान्यता दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com