NCP Crisis News: नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांना जिल्ह्यात दुय्यम स्थान?

Chhagan Bhujbal News: पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला छगन भुजबळ मारणार दांडी
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : नुकतेच अजित पवार यांच्या समवेत एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले छगन भुजबळ मंत्री झालेत, मात्र शिंदे गटाची ताठर भूमिका लक्षात घेता त्यांना नाशिक जिल्ह्याच्या कारभारात दुय्यम स्थान असेल सध्याचे चित्र आहे. यावरून भुजबळ तसेच त्यांचे समर्थक देखील नाखुष असल्याचे दिसते. (Since Shinde Group`s Dada Bhuse is a Guardian Minster Chhagan Bhujbal may upset)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट भाजपसमवेत (BJP) गेला आहे. अशा स्थितीत मंत्री झालेले भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मात्र नाशिकच्या राजकारणात शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समवेत दुय्यम स्थान मिळू शकते. त्याबाबतची नाराजी लपून राहिलेले नाहीत.

Chhagan Bhujbal
Dr. Bharti Pawar News : ८ वर्षे रेंगाळेल्या ड्राय पोर्टसाठी जमीन खरेदीचे आदेश!

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या अत्यंत विचित्र स्थिती आहे. जिल्ह्यात १५ आमदार आहेत. त्यात भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिंदे गटाचे २ असे तेरा आमदार शासन समर्थक आहेत. केवळ काँग्रेसचे हिरामण खोसकर आणि एणआयएमचे मौलाना मुफ्ती हे दोनच आमदार खरे विरोधक आहेत.

त्यामुळे सत्तेत सहभागी झालेले वरचढ अन् निष्ठावंतांना दुय्यम स्थान अशी स्थिती झालेली आहे. त्यात आधीचे बंडखोर कोण?, खरे बंडखोर कोण? अशी स्पर्धा बंडखोर गट एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात लागल्याचे चित्र दिसून येते.

Chhagan Bhujbal
Dhananjay Munde VS NCP : मुंडेंविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड; नेमक झालं काय?

राष्ट्रवादी काँग्रेस गटातील सहा आमदार सरकारमध्ये सामील झाले आहेत. मात्र यातील छगन भुजबळ वगळता अन्य पाच आमदारांचा यापूर्वी देखील छगन भुजबळ यांना पालकमंत्री म्हणून विरोध होताच. महाविकास आघाडीचे सरकार असताना अगदी सुरवातीलाच माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार या आमदारांनी थेट शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत तक्रार केल्याचे बोलले जाते. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यात हस्तक्षेप करून श्री. भुजबळ यांना पदावर कायम ठेवले होते.

Chhagan Bhujbal
Eknath Shinde On Thackeray: महाकलंक तर तुम्ही आहात; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नव्या राजकीय समिकरणांत मात्र ही स्थिती अनुकूल होताना दिसत नाही. एकनाथ शिंदे गटाचा भुजबळ यांना विरोध कायम आहे. आमदार सुहास कांदे आणि भुजबळ यांच्या राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य आमदार देखील अजित पवार यांच्याशी थेट संपर्कात आहेत. अशा स्थितीत भुजबळ यांच्यासाठी कोणता नेते स्थानिक आमदारांचे समर्थन मिळवेल याची उत्सुकता आहे. अशा स्थितीत वरीष्ठ मंत्री असुन देखील भुजबळ यांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com