Vasant Gite Politics: माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपला डिवचले; भाजपने समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नये!

Shivsena UBT leader Vasant Gite Criticizes Nashik BJP : माजी आमदार वसंत गीते म्हणाले, जनतेचा पोलीस आयुक्तांवर विश्वास, भाजपची पोलिसांच्या कामात लुडबुड नको
Vasant Gite, Shivsena
Vasant Gite, ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Vasant Gite News: नाशिक शहरातील बेकायदेशीर कामे आणि गुन्हेगारी या विरोधात शहर पोलिसांनी मोहीम उघडली आहे. तमाम नाशिककरांनी त्याचे स्वागत केले आहे. पोलिसांनी आपले कामकाज असेच धडाकेबाज पद्धतीने सुरू ठेवावे, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांनी म्हटले आहे.

यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष परिस्थितीचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या शहराचा विचका केलेल्या या पक्षाकडून पोलिसांच्या कामकाजाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार गीते यांनी केला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्याबाबत धक्कादायक विधान केले आहे. माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपले कार्ड दाखवून गैरप्रकार करत असल्यास नावे कळवावी. ही नावे पोलिसांना कळविण्यात येतील, असे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.

Vasant Gite, Shivsena
Nashik Crime : धक्कादायक! केंद्रीय राज्यमंत्र्याच्या निकटवर्तीय नगरसेवकाच्या कार्यालयापाठोपाठ घरातही सापडले भुयार, पोलिसांचंही डोकं चक्रावलं

श्री. केदार यांचा हा दावा हास्यास्पद वाटतो. भाजपने सर्वात आधी किती लोकांना प्रवेश दिला आहे, याची यादी तयार करावी. ही यादी पोलीस आयुक्तांना द्यावी. त्यामुळे शहरातील गुन्हेगार कोण? याची माहिती पोलिसांना आपोआपच समजेल.

Vasant Gite, Shivsena
Sangram Jagtap Hindutva controversy : पक्षानं नोटीस काढली, प्रश्न करताच, संग्राम जगतापांची 'सूचक कृती'; अजितदादांशी बोलणार, म्हणत घेतला काढता पाय!

नागरिकांचा पोलिस आयुक्त आणि यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आणि संपुष्टात आणण्यासाठी ते सक्षम आहेत. नागरिकांनीही त्यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने विविध क्लुप्त्या आणि मार्गाने पोलीसांवर दबाव आणू नये. पोलिसांना मुक्तपणे काम करू द्यावे.

भाजपने पर्यायी पोलीस यंत्रणा किंवा समांतर पोलिस आयुक्त कार्यालय सुरू करू नये. नागरिकांना गुन्हेगारांची यादी अथवा तक्रारी आणि नावे कळविण्यासाठी थेट पोलीस यंत्रणे कडेच कळविण्याची सोय आहे. त्यासाठी कोणिही मध्यस्थ नको, असे माजी आमदार गीते यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com