Prakash Londhe Case
Prakash Londhe Casesarkarnama

Nashik Crime : धक्कादायक! केंद्रीय राज्यमंत्र्याच्या निकटवर्तीय नगरसेवकाच्या कार्यालयापाठोपाठ घरातही सापडले भुयार, पोलिसांचंही डोकं चक्रावलं

Former RPI corporator Prakash Londhe Case : खंडणी, गोळीबार प्रकरणातील आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर तेथे भुयार आढळले होते. यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.
Published on
Summary
  1. माजी नगरसेवक आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रकाश लोंढे यांच्या घरात पोलिसांना आणखी एक भुयार सापडले आहे.

  2. आधी त्यांच्या कार्यालयात सापडलेल्या भुयारानंतर घरात सापडलेल्या या भुयारामुळे पोलिस तपास गडद झाला आहे.

  3. या प्रकरणामुळे उत्तर महाराष्ट्रात खळबळ माजली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Prakash Londhe News : केंद्रीय राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत रोज भर पडताना दिसत आहे. खंडणी आणि गोळीबार प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. पोलिस करत असलेल्या चौकशीतून आता लोंढे यांच्याकडून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आतातर त्यांचा कार्यालयापाठोपाठ घराची घेतलेल्या झडतीतही भुयार आढळले आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सातपूर येथील ऑरा बार आणि रेस्टॉरंटच्या मालकावर रविवारी (या.5) खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. ग्राहक आणि मालकावर चोपर ने हल्लाही झाला होता. त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली होती.

या प्रकरणातील टोळी चालविणारा भूषण लोंढे मात्र फरार झाला आहे. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंढे यांना पोलिसांनी अटक केलीय. त्याचा तपास सुरू असताना अनेक धक्कादायक बाबींचा आता उलगडा होताना दिसत आहे. तर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. राजकीय आश्रय मिळाल्यानेच लोंढे यांची गुन्हेगारी फोफावल्याचेही उघड झाले आहे.

Prakash Londhe Case
Nashik Crime : धक्कादायक! आरपीआय नेत्याच्या कार्यालयात आढळलं चक्क भुयार, अनेक वर्षांपासून गुन्हेगारीसाठी वापर!

यादरम्यान पोलिसांनी शनिवारी माजी नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडतीत धक्कादायक माहिती पुढे आली असून कार्यालयात भुयारी खोली आढळली. त्याचा उपयोग गुन्हेगारीसाठी झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

अशातच आज लोंढे यांच्या स्वार बाबा नगर येथील घराची झेडपी घेण्यात आली. घराचे सदस्य ही उपस्थित होते. झडती दरम्यान पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत घरातील भुयार आणि खोली दिसून आली. भुयारातील या खोलीचा काय आणि कशासाठी वापर होत होता? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

घराच्या तपासणीत काही लॉकर आणि कपाटे आढळली असून यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने लोंढे यांना एक कपाट उघडण्यास भाग पाडले. त्या कपाटातून भुयारात जाण्यासाठी मार्ग असल्याचे आढळले. पोलिसांनी लोंढे यांना स्वतः त्या भुयारात नेले आणि तपास केला.

प्रकाश लोंढे प्रकरणातून रोज नवे खुलासे होत आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक लोंढे यांच्या अडचणीत वाढ होत आहेत. लोंढे यांचा गँग चालवणारा मुलगा भूषण लोंढे सध्या फरारी आहे. माजी नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत होते. यापूर्वी ते पाडण्यात आले होते. मात्र पुन्हा त्याच जागी हे कार्यालय उभे राहिले. कार्यालयासह आता घरातदेखील काही गोपनीय खोल्या आणि भुयार बांधण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Prakash Londhe Case
Nashik Crime: धक्कादायक; प्रकाश लोंढे खंडणी आणि गोळीबार प्रकरणात कोणता भाजपचा नेता पोलिसांच्या रडारवर?

FAQs :

प्र.1: प्रकाश लोंढे कोण आहेत?
👉 ते माजी नगरसेवक आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत.

प्र.2: पोलिसांना काय सापडलं?
👉 त्यांच्या कार्यालयानंतर आता घरातही भुयार सापडले आहे.

प्र.3: भुयाराचा उद्देश काय होता?
👉 याबाबत पोलिस तपास सुरू असून अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्र.4: पोलिसांचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे?
👉 पोलिसांनी दोन्ही ठिकाणची चौकशी सुरू केली असून भुयाराच्या वापराचा शोध घेतला जात आहे.

प्र.5: या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत का?
👉 होय, राजकीय वर्तुळात यावर तीव्र चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com