Gulabrao Patil News: मंत्री गुलाबराव पाटलांना दणका; न्यायालयाने ठोठावला 'एवढा' दंड

Eknath Khadse and Gulabrao Patil : एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर एका प्रकरणात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.
Gulabrao Patil News
Gulabrao Patil NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News: राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. दाखल अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीला मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे.

दाखल अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाकडे आपल्या वकिलामार्फत अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने गुलाबराव पाटील यांचा अर्ज मंजूर केला. पण अर्ज मंजूर करताना त्यांना 500 रुपयांचा दंड केला.

Gulabrao Patil News
Western Maharashtra Survey: पश्चिम महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीत काँटे टक्कर; बडे नेते ‘डेंजर झोन’मध्ये; धक्कादायक निकाल लागणार

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे राज्यात चर्चेत असतात. एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर एका प्रकरणात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करत सरकारचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले, असा गंभीर आरोप गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर केला होता.

Gulabrao Patil News
Raosaheb Danve News : मुख्यमंत्र्यांच्या सभेला किती लाभार्थी आणणार सांगा, दानवेंचे अधिकाऱ्यांना टार्गेट..

या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरोधात 2016 मध्ये जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर या खटल्याची सुनावणी आता नव्याने सुरू झाली आहे.

दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्या दिवशीच गुलाबराव पाटील गैरहजर राहिले. यासाठी त्यांनी आपल्या वकिलामार्फत गैरहजर राहण्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. मात्र, त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.