Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe : 'फिक्स झालं'?, राधाकृष्ण विखेंचा 'सपोर्ट'; थोरातांना सुजय विखे आव्हान देणार

Minister Radhakrishna Vikhe big reaction on Sujay Vikhe decision to contest elections from Sangamner Assembly Constituency : माजी खासदार सुजय विखे संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखेंनी मोठी प्रतिक्रिया दिली.
Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe
Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : माजी खासदार सुजय विखे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाकडे सुजय विखेंचा कल दिसतोय.

यात त्यांचे वडील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखेंनी सुजय विखे यांच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे. तशी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सुजय विखेंचा लोकसभा निवडणूक पराभव झाला. हा पराभव विखे परिवाराला चांगलाच जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नगर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. किंगमेकरच्या भूमिकते राहिलं. थोरातांमुळेच पराभव झाल्यानं, आता सुजय विखेंकडून त्यांना आव्हान उभं केलं जात आहे. यातून त्यांनी पक्षाकडे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe
Kiran Lahamate : आमदार लहामटेंची कठोर भूमिका; अजितदादांची महायुतीत झाली कोंडी

सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या या निर्णयावर त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्याला जो निर्णय घ्यायचा, तो त्यानं घ्यावा, आम्ही त्याच्या निर्णयाबरोबर आहोत', असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं. सुजय विखे यांच्या संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या या निर्णयाला राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे 'सपोर्ट' केला आहे. तसं पाहिल्यास संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांविरोधात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे सुजय विखेंबाबत निर्णय झाल्यास, लढत लक्षवेधी होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंबाबत बाहेरचा उमेदवार, अशी जी धारणा झाली होती, तशी संगमनेरमध्ये होऊ शकते, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

Radhakrishna Vikhe And Sujay Vikhe
Radhakrishna Vikhe : काँग्रेस सरकारकडून गणपती आरतीवर बंदी; मंत्री विखेंचा संताप

महायुती सरकारच आरक्षण मार्गी लावणार

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी, 'जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला कोणाचा विरोध नाही. त्यांचा तो अधिकार आहे. मराठा आरक्षणासह 'धनगर' आणि 'ओबीसी'च्या समाजाच्या मागण्याबाबत महायुती सरकार सकारात्मक विचार आहे, असं सांगितलं.

राऊतांच्या विधानांची खिल्ली

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली. 'तुमच्या मनात काय आहे, याला महत्व नाही. जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य वैफल्यातून होत आहेत. आघाडीचे अस्तित्व फार दिवसाचे नाही, हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री महायुतीचा होणार', असा ठाम विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com