MLA Bachchu Kadu News : आमदार बच्चू कडू यांचा खोटेपणावर 'प्रहार' अन् महापालिका प्रशासनाची तारांबळ...

Ahmednagar Municipal News : चार कोटी 72 लाख रुपये इतक्या बनावट पावत्या व खोटे प्रमाणपत्र तयार करून अहमदनगर महापालिककडे भरणा केला. यावर कंपनीने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविल्याचा तारांकित प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी विधीमंडळात उपस्थि केला.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

Nagar News : अहमदनगर महापालिकेची (Ahmednagar Municipal ) चार कोटी 72 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. या प्रकारावर त्यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारने यावर उत्तर मागितल्यावर महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

प्रीमियमची रक्कम न भरता खोटे प्रमाणपत्र सादर करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवत महापालिकेची फसवणूक (Fraud) केल्याचा हा प्रकार आहे. बनावट पावत्या आणि खोटे प्रमाणपत्र सादर करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे. या प्रकारावर महापालिकेने (Municipal) कोणती कारवाई केली आहे? कारवाई केली की नाही केली? याचा अहवाल राज्य सरकारने आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मागितला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu Kadu
Anna Hajare News : संजय राऊत अन् आव्हाडांनंतर आता महाविकास आघाडीचा 'हा' नेताही अण्णा हजारेंवर भडकला!

साई मिडास इम्पेरियल टॉवर्स या कंपनीच्या संचालकांनी चार कोटी 72 लाख रुपये इतक्या बनावट पावत्या आणि खोटे प्रमाणपत्र तयार करून महापालिकेकडे भरणा केला आहे. तसे ते दाखवले. यावर संबंधित कंपनीने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविला. महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक यांनी त्यांच्या पत्रात मान्य केले आहे. महापालिकेने अद्याप साई मिडास इम्पेरियल टॉवर्सच्या संचालकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता विधीमंडळ अधिवेशनात (Legislative session) गाजण्याची शक्यता आहे. MLA Bachchu Kadus star question on fraud in Ahmednagar Municipal Corporation

या प्रकरणी कंपनीच्या संचालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गालिब अली व नागरिकांनी केली होती. तशी तक्रारच केली. यावर महापालिकेने नेमकी काय कारवाई केली हे समोर आले नाही. गालिब आली यांनी यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेची चार कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक करून पूर्णत्वाचा दाखल घेणाऱ्या कंपनी, कंपनीचे संचालक आणि मालकांविरुद्ध तसेच संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली, याची विचारणा आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला (government of a state) केली आहे.

कारवाई झाली नसल्यास विलंबाचे कारण काय? याची देखील विचारणा आमदार कडू यांनी केली आहे. आमदार कडू यांनी नगर महापालिकेचा प्रश्न थेट राज्य सरकार दरबारी नेल्याने हा विषय गंभीर असल्याची चर्चा होत आहे. या कंपनीला स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. आमदार कडू यांनी हा प्रश्न विधी मंडळात नेल्याने तो गाजणार असे दिसते आहे.

Bachchu Kadu
Nilesh Lanke News : चर्चा होणारच, नीलेश लंकेंना सासूरवाडीतून किती मताधिक्य?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com