Akole MLA Raid : 'आमदार थेट पोहोचले दारू अड्ड्यावर'; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा काळा कारभार उघड, किरण लहामटेंचा संताप

NCP MLA Kiran Lahamate exposes illegal liquor den Akole; Gram Panchayat employee allegedly involved : अकोले तालुक्याली अवैध दारू अड्ड्यावर थेट आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी धडक मारल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Akole MLA Raid
Akole MLA Raid Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Illegal Liquor : पुण्यात विषारी दारूमुळे 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारूविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडून धाडसत्र सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी स्वतः एका अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकत मोठा प्रकार उघडकीस आणला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध व्यवसाय ग्रामपंचायतीचाच एक कर्मचारी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोले (Akole) विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमासाठी राजूरहून निळवंडेमार्गे सांगवीकडे जात असताना आमदार लहामटे यांच्या नजरेस निळवंडे शिवारात एका ठिकाणी मोठी गर्दी दिसली. गर्दीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी वाहन थांबवून चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

आमदार लहामटे (Kiran Lahamate) घटनास्थळी पोहोचताच अनेकांनी तेथून पळ काढला. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात दारूच्या बाटल्या, विक्रीसाठी वापरले जाणारे ऑनलाइन स्कॅनर आणि अन्य साहित्य आढळून आले. हा अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Akole MLA Raid
VBA vs Maha Vikas Aghadi : भाजपविरोधी की भाजपची ‘ए-टीम’? विधान परिषद निवडणुकीवरून वंचितचा 'मविआ'वर घणाघात

पुढील चौकशीत मेहेंदुरी येथील ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी हा अवैध दारू व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. आमदार लहामटे यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या ठिकाणी एक दुचाकीही आढळून आली होती. संशयित पळून जाऊ नये म्हणून तिची हवा सोडण्यात आली. मात्र आमदार तेथून निघून गेल्यानंतर ती दुचाकीही रहस्यमयरीत्या गायब झाल्याचे समोर आले.

Akole MLA Raid
Shiv Sena Leader Cheated : स्वस्त सोन्याच्या आमिषात अडकला शिंदे शिवसेना सदस्य; 52.80 लाखांची लूट, ऊसातून बाहेर आली टोळी, पुढे एकच थरार...

शासकीय कर्मचाऱ्याचा अड्डा

ग्रामपंचायतीचा कर्मचारी असूनही हा अवैध धंदा सुरू राहिला, यामागे स्थानिक बीट हवालदाराचे अभय असल्याचा गंभीर आरोप आमदार लहामटे यांनी केला. संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आमदारांच्या कठोर कारवाईच्या सूचना

"अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अवैध दारू व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अकोले तालुक्यातील अवैध दारूचे अड्डे कायमचे बंद झाले पाहिजेत," अशी भूमिका आमदार लहामटे यांनी मांडली.

घर मालकाचे शासकीय लाभ बंद होणार

दरम्यान, ज्या घरातून हा अवैध दारू व्यवसाय चालवला जात होता, त्या घराचे सर्व शासकीय लाभ बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना तडीपार करण्याची मागणीही त्यांनी केली. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात सुरू झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अकोलेतील हा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com