आमदार किशोर पाटील देणार हजार तरुणांना रोजगार देणार!

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार किशोर पाटील यांनी केला संकल्प
Kishor Patil
Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

पाचोरा : पाचोरा -भडगाव (Pachora constituency) विधानसभा मतदारसंघात गेल्या सात वर्षांच्या कार्यकाळात नावीन्यपूर्ण विकासकामे (Devolopment works) पूर्णत्वास नेली असून, यापुढेही परिपूर्ण विकासासाठी कटिबद्ध असून, मतदारसंघातील विकासाचा पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल, (Unique pattern of Devolopment) असे काम करणार असल्याचा निर्धार आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. (MLA Kishor Patil claim his constituency is model of Devolopment)

Kishor Patil
जनतेचे राजे व्हायचे आहे, त्यासाठी शिंदेंबरोबर गेलो!

आमदार पाटील म्हणाले, की तरुणांच्या हातांना काम, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा, सुसज्ज शेतरस्ते, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करणे, शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढणे आणि मतदारसंघातील शंभर टक्के मूलभूत सुविधा निर्माण करणे या पंचसूत्रीनुसार आराखडा तयार करून आगामी काळात मतदारसंघात विकासाचा वेग दुप्पट वेगाने करण्याचे नियोजन आहे. ते पुढे म्हणाले, की राज्य सरकारच्या विविधांगी योजनांसह डीपीडीसी व इतर शासकीय विभागांच्या योजनांचा अभ्यास करून कामांच्या मागणीचा प्रस्ताव मांडून व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून विकासकामे मंजूर करून आणली. ती पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेला दिलेल्या वचनापेक्षा जास्त कामे केल्याचा विश्वासपूर्वक दावा त्यांनी केला.

Kishor Patil
Gujrat Politics| गुजरात निवडणुकीपुर्वी शहांचा डाव, केली मोठी घोषणा

हजार तरुणांना रोजगार देणार

पाचोरा- भडगाव तालुके हे बागायती असले तरी निर्मल सीड्स वगळता रोजगार देऊ शकेल, असा मोठा उद्योग दोन्ही तालुक्यात नाही. दोन्ही तालुक्यात कापसाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सहकारी तत्त्वावर सूतगिरणी सुरू करण्याचे नियोजन आहे. पाचोरा तालुक्यात सूतगिरणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक महिन्याच्या आत शासनाकडून १८ कोटीचा हप्ताही पडणार आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला गती मिळेल. तर भडगाव तालुक्यातही एक सूतगिरणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२४ पर्यंत या सूतगिरण्या सुरू होऊन मतदारसंघातील किमान दोन हजार तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

भडगाव तालुका विजेबाबत स्वयंपूर्ण

आमदार किशोर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात पाचोरा व भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांत गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा वीज भारनियमनाचा तसेच सतत विजेच्या होत असलेल्या लपंडावाचा प्रश्न मोठ्या प्रयत्नाने सोडवला. त्यांनी वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी विधानभवनाच्या पायरीवर उपोषण केले. त्यामुळे १३२ केव्हीचे वीज उपकेंद्र मंजूर होऊन सद्य:स्थितीतील हे उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे. तसेच पाचोरा तालुक्यातील तारखेडा, लासगाव, माहेजी येथे कोट्यवधी रुपये खर्चाची वीज उपकेंद्राची उभारणी केली. यासोबतच जीर्ण झालेले सुमारे दोनशे विजेचे खांब तसेच कमी क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बदलवून जास्त क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बसवले. भडगाव तालुक्यातील वडजी, लोणपिराचे, वडधे येथे नवीन वीज उपकेंद्राची उभारणी केली.

पाचोरा शहर विकासाचे मॉडेल़

पाचोरा शहर जिल्ह्यात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भाजी व फळ विक्रेते आपली दुकाने थाटत होते. त्यामुळे बहुतांश रस्ते व चौकात अतिक्रमण व वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न भेडसावू लागला होता. तसेच ग्राहकांना देखील प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. असे सर्व भाजी व फळ विक्रेते एकाच छताखाली यावेत, त्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी भाजी मंडई उभारण्यात आली आहे. तर स्मशानभूमी, वाचनालय, शापिग कॉम्पलेक्स शहराचे वैभव वाढविणारे आहे. याशिवाय शहरातील भूमिगत गटारी विकासाचे मापदंड ठरले आहे. पाचोरा-भडगाव शहरातील खुल्या भूखंडांचे भाग्य उजळले आहे. पाचोरा शहरात तब्बल १९८ खुले भूखंड विकसित होताहेत तर भडगावातील जवळपास ७५ खुल्या भूखंडांचा विकास होणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com