Shivsena Politics: बहिणीचा प्रश्न, `तीन हजार कोटीची कामे करूनही आमदार किशोर पाटील अस्वस्थ का`

Vaishali Suryavanshi challenges Shinde Candidate Kishor Patil: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदार किशोर पाटील यांच्याकडे मागितला कामांचा हिशोब
MLA Kishor Patil & Vaishali Suryawanshi
MLA Kishor Patil & Vaishali SuryawanshiSarkarnama
Published on
Updated on

Pachora Assembly Constituency: पाचोरा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राजकारण पेटले आहे. या निमित्ताने बहिण आणि भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

पाचोरा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेतील बंडखोरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला मतदारसंघातून ठाकरे समर्थकांचा आणि अगदी घरातूनन देखील विरोध झाला. त्यामुळे त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी केली आहे. या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाऊ-बहीण यांच्यात यंदाचा सामना अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे.

MLA Kishor Patil & Vaishali Suryawanshi
Keda Aher Politics: दहा संचालक विधानसभेचे उमेदवार; आजारी जिल्हा बँकेविषयी निवडणुकीत मौन!

आमदार पाटील यांची निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. आमदार पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी आमदार पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा येथे सहभाग घेऊन मतदारांना आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील हे माझे मानसपुत्र आहेत. आमदार पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून द्या त्यांची हॅटट्रिक झाल्यास मतदार संघातील सिंचन, उद्योग, कृषी आणि नागरीकरणाचे सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

MLA Kishor Patil & Vaishali Suryawanshi
Keda Aher Politics: दहा संचालक विधानसभेचे उमेदवार; आजारी जिल्हा बँकेविषयी निवडणुकीत मौन!

मुख्यमंत्री शिंदे यांनी या मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर विशेष भर दिला. या योजनेमुळे विरोधकांना राजकीय प्रचारात बोलण्यासाठी मुद्देच राहिलेले नाहीत. आमच्या लाडक्या बहिणी महाविकास आघाडीचा कार्यक्रम करतील महाविकास आघाडी या निवडणुकीत औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेने पाचोरा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी त्याला थेट उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आमदार मतदारसंघात तीन हजार कोटींची कामे केल्याचा दावा करतात. एवढा निधी आजवर कोणीच आणला नाही, असेही ते सांगतात. मग निवडणूक प्रचारक ते एवढे अधीर आणि अस्वस्थ कसे झालेत. त्यांना कसली भीती वाटते आहे, असा प्रश्न करून शिंदे गटाच्या उमेदवाराच्या मर्मावरच बोट ठेवले आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार श्रीमती सूर्यवंशी यांचे आरोप आमदार पाटील यांच्या चांगले जिव्हारी लागले आहेत. सूर्यवंशी यांनी आमदार पाटील यांच्या सर्वच कामकाजाचा पंचनामा केला आहे. मतदार संघात घनकचरा व्यवस्थापन पद्धती, रस्ते, कोरोना काळातील कामगारांची भरती, नगरपालिकेसाठी झालेली विविध खरेदी आणि त्याबाबत आलेल्या तक्रारी यांची चौकशी प्रशासनाने करावी. या चौकशीला विद्यमान आमदार का घाबरतात? असाप्रश्न सुर्यवंशी यांनी केला.

आजवर मतदारसंघातील केलेली कामे आणि त्यांचा दर्जा नागरिकांना चांगलाच माहित आहे. पालिकेच्या निधीचा सर्रास दुरुपयोग झाला आहे. शहरातील भूखंड लोकांना वाटण्यात आली आहेत. त्यामुळे आता आमदार पाटील यांनी भूल थापा थांबवाव्यात. मतदारसंघात भय आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार सज्ज झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत पारोळा मतदार संघात हमखास परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आमदार पाटील आणि त्यांच्या भगिनी श्रीमती सूर्यवंशी यांच्यातील आरोप प्रत्यारोप यांनी ही निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com