MLA Kishore Darade on Vivek Kolhe : पैठणी वाटपाच्या आरोपावर आमदार दराडेंचे प्रत्युत्तर, 'साखर सम्राट उमेदवार...

MLA Kishore Darade Vivek Kolhe Nashik Teachers Constituency : माझ्या प्रतिज्ञापत्रात जे गुन्हे आहेत, त्याची माहिती मी दिली आहे. त्यात काही त्रुटी असल्यास माझ्यावर हरकत घ्यायला हवी होती, असे दराडे म्हणाले.
Kishore Darade
Kishore DaradeSarkarnama
Published on
Updated on

Kishore Darade News: गेल्या पाच वर्षात शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे पैठणी वाटपाचे चुकीचे आरोप करून माझ्या बदनामीचे षडयंत्र केले जात आहे. असे प्रत्युत्तर विवेक कोल्हे यांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी दिले आहे.

विवेक कोल्हे यांनी दराडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना दराडे यांनी आज (शनिवारी) उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या विरोधात नवीन राजकारणी हे साखर सम्राट आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप करण्याऐवजी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने त्यावर बोलावे.

माझ्या प्रतिज्ञापत्रात जे गुन्हे आहेत, त्याची माहिती मी दिली आहे. त्यात काही त्रुटी असल्यास माझ्यावर हरकत घ्यायला हवी होती. मात्र, आता ते चुकीची विधाने करून माझ्याविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत. मला जन्मठेपेची शिक्षा झालेली नाही. संबंधित प्रकरणात मला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे, असे दराडे Kishore Darade यांनी सांगितले.

Kishore Darade
Ajit Pawar : अण्णा हजारेंमार्फत अजितदादांविरोधात भाजपचं मोठं षडयंत्र, कोणी केला आरोप?

प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माझ्याशी नाम साधर्म्य व भाऊबंद असलेल्या एकाला उमेदवारीचे आमिष दाखवले. त्याला पंधरा लाख रुपये देणार होते. नोकरी देखील दिली जाणार होती. त्यासाठी त्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा दबाव निर्माण केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ दिले नाही.

नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराने त्यांच्या जीवाला धोका असल्याने माझी मदत मागितली होती. त्या उमेदवाराच्या कुटुंबीयांना आपल्या मुलाचे अपहरण करतील, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी आमची मदत घेतली. मी कुणालाही धक्काबुक्की केलेली नाही. त्यावेळी आजूबाजूला काही घडले असल्यास त्याबद्दल मला काहीही सांगता येणार नाही, अशी भूमिका घेत. अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांच्या उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडी व आरोपण बाबत दराडे यांनी हात झटकले.

(Edited By Roshan More)

Kishore Darade
Sunil Tatkare : तटकरेंना काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांनी लोकसभेला मदत केली? तटकरेंच्या दाव्यानंतर संशयकल्लोळ!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com