Nilesh Lanke News: लंकेंचा दावा ; 4 जूनला बातमी येणार, नगर दक्षिणचे विजयी उमेदवार नीलेश लंके... ‘जायंट किलर’

Nagar Lok Sabha Constituency 2024:"13 तारखेला अशी तुतारी वाजवा की दिल्लीवाल्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत. 4 जूनला बातमी येणार..नगर दक्षिणचे विजयी उमेदवार नीलेश लंके.. ‘जायंट किलर’ असा दावा लंकेंनी केला आहे.
Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sujay Vikhe, Nilesh Lankesakarnama

Nagar News: "तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे की काम करणारा...मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, एकदा संधी द्या..शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसद बंद नाही पाडली तर मग बोला," असा विश्वास व्यक्त करीत नगर दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर दंड थोपटले आहेत. "व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोला," असे लंकेंनी विखेंना सुनावले.

"एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, अभिमान वाटेल असे काम करून दाखवील,"असे लंके म्हणाले. "जनतेने इंग्रजांना पळवून लावले..ही काय चीज आहेत (सुजय विखे) जनतेला पाणी तोच देऊ शकतो ज्याच्यात 'पाणी' आहे. आमदार झाल्यावर लोकांची संपत्ती वाढते. मी कर्जबाजारी झालो. आमदार व्हायच्या आधी परिस्थिती बरी होती," असे त्यांनी सांगितले.

नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या गुंडगिरी आणि दहशतीवर विखे पिता-पुत्रांकडून (Sujay vikhe) सातत्याने आरोप होत आहेत. त्याला लंकेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. "मी गुंडगिरी वैगरे सगळं उकळून प्यायलो आहे. ग्रामपंचायत सदस्य ते आमदार उगाच नाही झालो. आता खासदार होईल. आपले हेड मास्तर (शरद पवार ) संयमी असल्याने आपल्याला संयम ठेवावा लागतो," असे लंके म्हणाले. "13 तारखेला अशी तुतारी वाजवा की दिल्लीवाल्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत. 4 जूनला बातमी येणार..नगर दक्षिणचे विजयी उमेदवार नीलेश लंके.. ‘जायंट किलर’ असा दावा लंकेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Maharashtra Politics : आरशात पाहा, आपली लायकी अन् औकात कळेल; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

ज्यांना शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीत पाठवले त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची सवय आहे. अमित शाह यांना भेटून आले आणि निर्यातबंदी उठवल्याचे सांगितले. सत्कार करून घेतले आणि नंतर कळाले बातमी खोटी आहे. नगरमध्ये रोजगार निर्माण होतील असे काही प्रोजेक्ट त्यांनी आणले का? तुमच्या घराकडे जाणारा नगर-मनमाड रस्ता त्यांना (सुजय विखे) तुम्हाला करता आला नाही. तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता? असा सवाल लंकेंनी उपस्थित केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com