Mahayuti Melava: महायुतीच्या मेळाव्याला आमदार लंके, काळे, लहामटेंची दांडी; विखेंनी समन्वयकांनाच धरले जबाबदार

Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा मेळावा नगर शहरात झाला.
MLA Nilesh Lanke, MLA Ashutosh Kale, MLA Kiran Lahamte
MLA Nilesh Lanke, MLA Ashutosh Kale, MLA Kiran LahamteSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील महायुती मेळाव्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन आमदार, भाजपचे एक माजी आमदार आणि शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी पाठ फिरवली. याला भाजप नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पक्षाच्या समन्वयकांना जबाबदार धरले आहे. 'महायुतीचा मेळावा आहे, आपआपल्या पक्षाच्या आमदारांच्या उपस्थितीची जबाबदारी समन्वयकांची होती',असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज महायुतीचा मेळावा नगर शहरात झाला. हा मेळाव्याला सुरूवातीपासून चर्चेत होती ती अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीची. आमदार लंके यांच्याबरोबर अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, भाजपचे अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड आणि शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Nilesh Lanke, MLA Ashutosh Kale, MLA Kiran Lahamte
MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी थोरात,ठाकरे, कोल्हे, आव्हाड अन् पवारांचं सगळंच काढलं...

आमदार लंके या मेळाव्यात सहभागी होणार का ? याची उत्सुकता होती. महायुतीचा मेळावा झाला तरी, आमदार लंके समोर आले नाहीत. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात का सहभागी झालो नाही, याचे उत्तर तेच देतील. त्यानंतरच या प्रश्नावर पडदा पडणार आहे.

मंत्री विखे यांनी याला पक्षाचे समन्वयकांना जबाबदार धरले आहे. 'हा महायुतीचा मेळावा आहे. ज्या, त्या पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाच्या समन्वयकांची यात मोठी जबाबदारी होती. पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी होती. परंतु काही कारणास्तव ते राहिले नसतील, ते मला काय कारण माहीत नाही. पण हे आमदार पक्षापेक्षा, महायुतीपेक्षा वेगळी भूमिका घेतील, असे मला वाटत नाही', असे मंत्री विखे यांनी म्हटले.

गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रावरून चर्चा

महायुतीच्या मेळाव्याला सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन झाली. मात्र, यात एकाही कर्तृत्ववान महान महिलांच्या प्रतिमेचा समावेश नव्हता. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा अभिवादनासाठी ठेवायला हव्या होत्या, अशी चर्चा होती.

तसेच महायुतीच्या फलकावर दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, अनंत दिघे, या प्रमुख छायाचित्रांचा समावेश होता. यामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र हवे होते, अशी चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती. यावर फलकाचा हा फाॅरमॅट राज्याकडून आला आहे. यात कोणताच बदल करता आला नाही, असे कारण देण्यात आले.

'काही नेते सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसमध्ये...'

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावर मंत्री विखे म्हणाले, "मी काही दिवसांपूर्वी याबाबत बोललो होतो. राज्यात मोठ्याप्रमाणात परिवर्तन दिसेल. काँग्रेसकडे नेतृत्व राहिलेले नाही. महाराष्ट्रापुरते जे काही नेते आहेत, ते फक्त सत्तेच्या लालसेने पक्षात टिकून आहेत. तिथे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा कोंडमारा होत होता. दिवंगत मुरली देवरा यांचे मुंबई काँग्रेस प्रदेशमध्ये मोठे योगदान होते.

देवरा यांचे चिरंजीव जे खासदार होते, त्यांना काँग्रेसमध्ये ज्यापद्धतीने वागवण्यात आले, आपमानित करण्यात आले. त्यामुळे कोणी चांगला आणि प्रामाणिक कार्यकर्ता त्या ठिकाणी पक्षात राहणेच शक्य नाही. असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहे. ठाकरे सेनेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, ते आज बाहेर पडून महायुतीत येण्यास तयार आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. नजीकच्या काळात फार मोठा बदल महाराष्ट्रात दिसेल, असे विखे म्हणाले.

अशोक चव्हाणांबद्दल सूचक वक्तव्य..

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल सूचक वक्तव्य केले.'देशात आणि जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व विश्वमान्य झाले आहे. उत्तुंग नेतृत्वाखाली काम करणे कधीही चांगले. त्यामुळे राहिलेल्या पक्षांमध्ये आऊटगोईंग वाढणार आहे आणि भाजपमध्ये इनकमिंग होणार आहे. पक्षाच्या भूमिकेशी काही लोक सुसंगत आहे. ते त्यांचे मन तयार करत आहेत आणि ते संपर्कात देखील आहेत', असे मंत्री विखे म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

MLA Nilesh Lanke, MLA Ashutosh Kale, MLA Kiran Lahamte
Sharad Pawar : 'कोंडाजी वाघ का..?' घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला शरद पवारांनी थेट नावासह ओळखलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com