Sharad Pawar : 'कोंडाजी वाघ का..?' घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला शरद पवारांनी थेट नावासह ओळखलं

Rohit Pawar's tweet : शरद पवार कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात तेव्हा...
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्ते यांच्यातील नात्यांबद्दल अनेक गोष्टी आणि किस्से आत्तापर्यंत ऐकायला मिळाले. शरद पवार कुठल्याही दौऱ्यानिमित्त राज्यात गेल्यानंतर प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला त्याच्या नावानिशी ओळखतात, असं वारंवार बोललं जातं. त्याचाच काहीसा प्रत्यय शनिवारी त्यांच्या जुन्नर येथील भाषणादरम्यान आला.

जुन्नरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी शरद पवार या ठिकणी आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी शरद पवार जेव्हा उभे राहिले. तेव्हा एका कार्यकर्त्याने मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. गर्दीच्या घोळक्यातून नेमकी ही घोषणा कुठून येते हे समजण्या अगोदरच शरद पवार यांनी त्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखलं. त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच टाळ्या आणि शिट्ट्यांचा गडगडात पाहायला मिळाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Beed lok Sabha Constituency : बीड लोकसभेचा उमेदवार ठरला ? महायुतीच्या मेळाव्यात शिक्कामोर्तब

पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगावमधील विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शरद पवार शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. तेव्हा गर्दीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या जय जय कार करणाऱ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तेव्हा गर्दीतल्या त्या कार्यकर्त्याकडे बघत शरद पवारांनी तो कोंडाजी वाघ आहे का ? अशी विचारणा केली. समोरून होकार आला, त्याचबरोबर शरद पवार यांच्या स्मरणशक्तीचं उपस्थितांना अप्रूप वाटलं.

रोहित पवारांचं ट्वीट

शरद पवार (Sharad Pawar) यांचा हा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) 'एक्स'वर (ट्विटर) शेअर केला आहे. तसेच शरद पवार यांच्या स्मरणशक्ती आणि कार्यकर्त्यांशी असलेला सलोख्याबाबत कौतुक केलं आहे. रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं की,'आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला सलाम.'

(Edited By- Ganesh Thombare)

Sharad Pawar
Mahayuti Beed Rally : महायुतीचा बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा अन् बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोच नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com