MLA Nilesh Lanke News: नीलेश लंके कर्जबाजारी, कुटुंबाकडे ३५ लाखांची मालमत्ता

Nagar South Lok Sabha Constituency 2024: नीलेश लंके यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. नीलेश लंके यांच्या संपत्तीत 31 लाख रुपयांची घट झाली आहे. कुटुंबाकडे 35 लाख 54 हजार 561.67 रुपयांची संपत्ती आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Nagar Political News : महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या संपत्तीत घट झाली आहे. नीलेश लंके यांच्या संपत्तीत 31 लाख रुपयांची घट झाली आहे. नीलेश लंके कुटुंबाकडे सध्या 35 लाख 54 हजार 561.67 रुपयांची संपत्ती आहे.

नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दाखवलेल्या संपत्तीच्या तुलनेत त्यांच्या एकूण संपत्तीत 31 लाख 37 हजार 238 रुपये घट झाली आहे.

माजी आमदार नीलेश लंके यांच्याकडे जंगम व स्थावर, अशी एकूण 42 लाख 54 हजार 436.52 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची पत्नी राणी लंके यांच्या नावावर केवळ 2 लाख 78 हजार 284.35 रुपये आहेत. तेजस आणि शिवम या दोन मुलांच्या नावावर अनुक्रमे 11 हजार 569 रुपये आणि 10 हजार 271 रुपये आहेत.

नीलेश लंके यांनी 2019 मध्ये पारनेर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जंगम मालमत्ता 58 लाख 56 हजार 521 रुपये होती. त्यात 2024 मध्ये कमी होऊन 23 लाख 32 हजार 226 रुपये किमतीची झाली आहे. स्थावर मालमत्ता 2009 मध्ये 15 लाख 35 हजार 153 रुपयांची होती. आता 2024 मध्ये 19 लाख 22 हजार 210 रुपये झाली आहे.

लंके यांच्या नावावर 37 लाख 48 हजार 757 रुपयांचे कर्ज आहे. सन 2019 मध्ये 32 लाख 28 हजार 989 रुपये होते. लंके यांच्याकडे 13 लाख 5 हजार 800 रुपयांचे वाहन असून, 14 लाख 7 हजार 100 रुपये किमतीचे सोने आहे.

पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांच्या नावावर केवळ जंगम मालमत्ता आहे. 2019 मध्ये 1 लाख 58 हजार 735 रुपये होती. आता 2024 मध्ये 2 लाख 78 हजार 384.35 एवढी झाली आहे. तसेच 2 लाख 6 हजार 250 रुपये किमतीचे सोने आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Sambhaji Kunjir News: पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

नीलेश लंके यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. श्री साई मल्टिस्टेट को-आॅप अॅग्रिकल्चर सोसायटीला जामीनदार म्हणून दिलेला 50 हजार रुपयांचा धनादेश न वटल्याने सहा आॅक्टोबर 2016 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे, तर दुसरा गुन्हा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते, त्यावेळी गुन्हा दाखल झाला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com