Radhakrishna Vikhe Vs Prajakta Tanpure : 'वाळू सत्ताधाऱ्यांसाठी अवघड जागेचं दुखणं'; अधिवेशनानंतर मंत्री विखेंच्या 'नियोजन समिती'च्या बैठकीत वाळू 'गाजली'

Radhakrishna Vikhe order to take action on illegal sand harvesting : अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी आणि इतर तालुक्यातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार केली. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावर जिल्हा प्रशासनला कारवाईचा आदेश दिला.
Radhakrishna Vikhe Vs Prajakta Tanpure
Radhakrishna Vikhe Vs Prajakta TanpureSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe And Prajakta Tanpure News : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना वाळूने जेरीस आणलं आहे. अवैध वाळू उपसा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. नवीन वाळू धोरणावर मंत्री विखे यांना पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सुरवातीलाच घेरले होते. मंत्री विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी याच मुद्यावरून मंत्री विखे यांना घेरल्याचे पाहायला मिळाले. मंत्री विखे यांनी राज्यात आणलेले नवीन वाळू धोरण फसल्यानंतर वाळू हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी अवघड जागेचं दुखणं बनत चालल्याचे दिसते. आमदार तनपुरे यांच्या तक्रारीवर मंत्री विखे यांनी जिल्हा प्रशासनाला कारवाईचा आदेश दिला आहे.

नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप (BJP) नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आॅनलाईन सहभाग घेतला. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बैठकीच्या सुरवातीलाच राहुरी तालुक्यातील अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. राहुरीतील सोनगाव, सात्रळ आणि इतर तालुक्यातील नदीपात्रामधून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून, मंत्री विखे यांनी देखील यात लक्ष घालावे, अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली. पावसाळ्यात जून ते सप्टेंबरमध्ये वाळी उपसा बंदी असते. तरी देखील नदीपात्रातून वाळू उपसा होत आहे. मंत्री विखे यांनी जिल्हा प्रशासन याबाबत दखल घेऊन कारवाई करतील, असे सांगून शांत राहिले.

Radhakrishna Vikhe Vs Prajakta Tanpure
Bhausaheb Wakchaure : खासदार वाकचौरे यांच्या महसूल बैठकीत शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं...

राज्यात कांदा आणि दुधानंतर सत्ताधाऱ्यांचे वाळू ही डोकेदुखी ठरली आहे. महसूल खाते येताच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी राज्यात नवीन वाळू धोरणाची घोषणा केली. परंतु हे धोरण फसले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांची अनेकदा कोंडी केली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री विखे यांच्यात अधिवेशन काळात याच मुद्यावरून खडाजंगी झाली होती. विरोधकांनी नवीन वाळू धोरणाच चिरफाड केली. मंत्री विखे यांनी विरोधकांना वाळू धोरणात नवीन बदल केले जातील, असे सांगून शांत केले.

Radhakrishna Vikhe Vs Prajakta Tanpure
Nilesh Lanke and Rani Lanke : पदर खोचला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवली; राणी लंकेंचा भाकरी भाजता-भाजता सरकारला इशारा

वाळू हा मुद्दा स्थानिकवरून राज्यपातळीवर गेला आहे. आता याच मुद्यावरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री विखे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणानुसार अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी यांना केला.

मंत्री विखेंकडून महावितरणविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल

नगर तालुक्यात विजेच्या तारा तुटल्याने त्याला चिटकून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. संबंधित शेतकऱ्याने महावितरणला तारा तुटल्याचे एक दिवस अगोदर कळवले होते. परंतु त्यावर महावितरणकडून कोणतीची कार्यवाही झाली नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेत आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com