आमदार राजेश पाडवी विद्यार्थ्यांचे ठरले संकटमोचक!

हवालदिल विद्यार्थ्यांची चौकशी करीत त्यांना वेळेत परीक्षेसाठी पोचण्यासाठी केली मदत.
MLA Rajesh Padwi
MLA Rajesh Padwi Sarkarnama
Published on
Updated on

तळोदा : तळोद्यातील (Nandurbar) शाळेमध्ये सहामाही परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची (Students) बस नादुरुस्त (Bus Fail) झाल्याने, घाबरलेल्या व हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आमदार राजेश पाडवी (MLA Rajesh Padwi) संकटमोचन म्हणून धावून आले. आमदार पाडवींनी विद्यार्थ्यांना खासगी वाहनांची व्यवस्था करीत तर काही विद्यार्थ्यांना स्वतःच वाहनाने वेळेत परीक्षेसाठी शाळेत पोचविले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.(MLA Rajesh Padwi given assistancs to students going for Exam)

MLA Rajesh Padwi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

तळोदा तालुक्यातील बोरद, गुंजाळी, मोड, मोरवड, तळवे, आमलाड आदी गावातील विद्यार्थी तळोद्यातील महाविद्यालय व शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये सहामाही परीक्षेच्या हंगाम सुरू आहे. शनिवारी मोड परिसरातील विद्यार्थी दुपारी एक वाजेच्या बसने मोड येथून तळोद्याकडे येत होते. मात्र कढेल फाट्याजवळ बस नादुरुस्त झाली. बस नादुरुस्त झाल्याने बसमधील विद्यार्थी हवालदिल झाले.

MLA Rajesh Padwi
Shivsena: `आता याचा बदला लोकच घेतील`

आमदार पाडवींनी थांबविले वाहन

विद्यार्थी पर्यायी काही वाहन भेटते का याचा शोध घेत होते. आमदार राजेश पाडवी हे शहादा येथील कार्यक्रम आटपून या मार्गावरून तळोद्याकडे येत होते. विद्यार्थ्यांनी आमदार पाडवी यांच्या गाडीला हात दाखवत थांबविण्याचा प्रयत्न केला. आमदार पाडवींनी देखील गाडी थांबवून विद्यार्थी-विद्यार्थिनींची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

अडचण समजून घेत आमदार पाडवींनी लागलीच विद्यार्थ्यांसाठी दोन खासगी वाहनांची व एका रिक्षाची व्यवस्था केली. उर्वरित विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनात बसवून शाळेच्या दालनापर्यंत सोडले. चक्क आमदाराचा वाहनातून प्रवास केल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व विद्यार्थ्यांनी आमदार राजेश पाडवी यांचे आभार मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com