Shivsena: `आता याचा बदला लोकच घेतील`

शिवसेनेने कोणतेही चिन्ह दिले तरी लोक प्रेमाने स्विकारून विरोधकांचा काटा काढतील.
Baban Gholap
Baban GholapSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtara) जनतेला शिवसेना (Shivsena) आता नवी राहिलेली नाही. छपन्न वर्षे शिवसेना जनमाणसात काम करते आहे. आम्ही कोणतेही चिन्ह घेतले तरी त्याला लोकप्रिय (Popular) होण्यास काहीच वेळ लागणार नाही. शिवसेना जे चिन्ह देईल ते लोक अतिशय प्रेमाने स्विकारतील. धनुष्यबाण नसला तरी जे चिन्ह मिळेल त्याने विरोधकांचा काटा काढू, असे शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री बनराव घोलप (Baban Gholap) यांनी सांगितले. (Dy leader Babanrao Gholap express confidence on any symbol will popular of Shivsena)

Baban Gholap
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह तत्पुरते गोठवले. त्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, काल दिवसभरातील घडामोडी आपण सगळेच ऐकत होतो. त्यानुसार सकृतदर्शनी असं होतं की शिवसेनेचे पारडे खुप जड आहे. तुलनात्मकदृष्टया ज्यांना कायद्याचा अभ्यास नाही, त्यांना देखली असेच वाटले होते. शिवसेनेची स्थिती निवडणूक आयोगाच्या प्रकरणात उत्तम आहे. परंतु आम्हाला जी भिती, किंवा सर्वोच्च न्यायालयाचे शिवसेनेच्या खटल्या संदर्भातील सर्वेसर्वा न्यायमूर्ती रामण्णा यांच्याकडे जी सुनावणी लांबत चालली होती. त्यातून अशी भावना होते, की निर्णय न देण्याबाबत काही दबाव तर नाही ना.

Baban Gholap
'धनुष्यबाण' गोठवणे हे निवडणूक आयोगाचे मॅचफिक्सिंग : सामनातून टिकास्त्र!

पक्ष व चिन्ह याबाबतचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले पाहिजे, कारण आयोग आमच्या हातात आहे, असे काही अदृष्य शक्तींना वाटत होते. या अदृष्य शक्ती कोण हे सर्वांना माहित आहे. ते सांगण्याची गरज नाही. ही सर्व जी भिती होती, ती कालच्या निर्णयाने खरी ठरली.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असेल. शिवसेनेचा गट असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा तर तीथे उमेदवार देखील नाही.त्यांनी भाजपला पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे दोन धनुष्यबाण चिन्ह किंवा दोन शिवसेना असा काही विषयच नव्हता.

श्री. घोलप पुढे म्हणाले, हे उघड उघड लक्षात येते की, कोणाला तरी असे वाटते की हे केल्याने शिवसेनेचे नुकसान होईल. मात्र कोणाच्या मनात जर असं वेडवाकडे काही करायचा विचार असेल तर त्याने शिवसेनेचे अजिबात नुकसान होणार नाही. शिवसेनेबद्दल अतिशय मोठी सहानुभूती वाढते आहे. पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्याबद्दलचा प्रतिसाद वाढतो आहे. याचा बदला लोकच घेतील.

लोकांची मानसिकता आता शिवसेनेकडे अधिक वाढली आहे. अनेकांचे फोन येतात. लोक भेटतात. कार्यकर्ते सागंतात. त्यांच्या तोंडून असे ऐकायला मिळते, की ते अजिबात नाराज नाहीत. आज बंडखोर मंडळी सत्तेत आहे. मात्र त्यांनी जे केले ते त्यांना भोगावे लागेल, अशी प्रतिक्रीया जनसामान्यांतून येते आहे. हे सत्य आहे.

श्री. घोलप यांनी अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, देशाला, महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना काही आता नवी राहिलेली नाही. छपन्न वर्षे शिवसेना जनमाणसात काम करते आहे. आम्ही कोणतेही चिन्ह घेतले तर त्याला लोकप्रिय होण्यास काहीच वेळ लागणार नाही. काँग्रेसचे चिन्ह पंजा जसा लोकांच्या डोक्यातून काढता येणार नाही, तसेच शिवसेना जे चिन्ह देईल ते लोक अतिशय प्रेमाने स्विकारतील. धनुष्यबाण नसला तरी जे चिन्ह मिळेल त्याने विरोधकांचा काटा काढणारच.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com