Rohit Pawar : भाजप आमदार 'कॉपी बहाद्दर'; रोहित पवार म्हणाले, 'त्यांनी 20 लाख रुपये देत...'

MLA Rohit Pawar criticizes BJP MLA Ram Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील आगाराच्या लोकार्पण कार्यक्रमात भाजप आमदार राम शिंदेंवर टीका केली आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांवर निशाणा साधण्याची कोणतीच संधी सोडत नाही. राज्यात बहुतांशी लढतीपैकी कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवडणूक असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषद आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसा राजकीय संघर्ष टोकाचा होऊ लागला आहे. यातच आमदार रोहित पवारांनी राम शिंदे कॉपी बहाद्दर असल्याची टीका केली.

आमदार रोहित पवार यांनी कर्जत एसटी आगाराचे लोकार्पण केले. माजी परिवहन मंत्री तथा शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी यावेळी भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आमदार शिंदे यांना कॉपी बहाद्दर, असं अप्रत्यक्ष म्हटलं आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar News : 'आमच्याबाबत सुडाचे राजकारण कुणी करत असेल, तर..' ; रोहित पवारांचा इशारा!

रोहित पवार म्हणाले, "मंत्री असताना लोकप्रतिनिधी कर्जत आगाराचे पत्र तयार होत आहे, असे सांगायचे. मात्र त्यावेळी त्यांनी वेळ मारून नेली. त्यांना करता आले नाही. कारण करायला धमक लागते. कदाचित ती धमक त्यांच्यात नसावी". आपल्यासारखी वेशभूषा आणि कार्यक्रम इव्हेंट, कॉपी करण्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये देत कन्सल्टंट नेमलाय, असा टोला भाजप (BJP) आमदार शिंदे यांचे नाव न घेता आमदार पवार यांनी लगावला.

Rohit Pawar
Rohit Pawar on SRPF Training Centre : जामखेडच्या 'SRPF' प्रशिक्षण केंद्रावरून राजकारण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांनी रोखलं!

माजी मंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधीनी कर्जत पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पणात पोलिस चौकीची मागणी केली असता, तुम्ही क्राईम रेट वाढवा, तेव्हा मंजूर होईल, असं म्हटलं होतं. आपण दोन पोलिस ठाणे आणले. राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र आणले. ते सर्वसामान्य जनतेसाठी. मागील काळात कर्जत बसस्थानक श्रीगोंदा, जामखेड, करमाळा, बारामती आणि अहमदनगरवर अवलंबून राहत होते. मात्र ती परिस्थिती आपण निश्चित बदल करू. माझी ओळख ही कर्जत-जामखेडच्या जनतेमुळे झाली हे कदापि विसरणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटलं.

माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली खुर्ची ही जनतेच्या कामासाठी असली, तर तिचा उपयोग असतो. कर्जतच्या एसटी आगाराबाबत विभागातील वरिष्ठ अधिकारी नकार घंटा वाजवत होते. मी मंत्री असताना आमदार रोहित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एका महिन्यात कर्जतच्या एसटी आगाराला मान्यता मिळवून दिली. तिचा आज वचनपूर्ती कार्यक्रम होत आहे. याचा मला आनंद होत असल्याचे सांगितलं.सदरच्या एसटी बस आगारासाठी तुरुंगवास भोगलेल्या आंदोलनकर्त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

आमदार पवार मुख्यमंत्री... शिक्षणमंत्री... आणि आता अर्थमंत्री...

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मिरजगाव येथील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांचे शैक्षणिक कार्यावर स्तुतीसुमने करीत ते महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होवो, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. तर आज माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या भाषणात आगामी काळात महाराष्ट्रात मविआ सरकार येणार असून आमदार रोहित पवार यांच्याकडे अर्थखाते येईल, अशी भविष्यवाणी केली. कार्यकर्ते बॅनरबाजी करताना भावी मुख्यमंत्री, अशी करतात.

रोहित पवारांसाठी 'रास्ता रोको'

जामखेडच्या कुसडगाव इथल्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर लोकार्पण कार्यक्रमात राडा झाला. याचा कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने निषेध केला. रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पूर्ण झाले. मात्र प्रशिक्षण केंद्रात जाण्यास त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रोहित पवारांनी दोन तास ठिय्या दिला. यावेळी रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गेटवर चढत केंद्राचे उद्घाटन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com