Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात सांगितली राज्य सरकारने केलेल्या कामांंची यादी; म्हणाले...

Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाचा कोल्हापुरमध्ये शुभारंभ करण्यात आला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : राज्य सरकारकडून सध्या 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच आज (दि.13 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाचा कोल्हापुरमध्ये शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारने केलेल्या कामाची यादीच सांगितली. तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली.

शिंदे म्हणाले, "राज्यातील हजारो लोकं 'शासन आपल्या दारी' या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून योजना आणि मिळणारा लाभ हे सर्व एका छताखाली घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोल्हापुरमध्ये तब्बल दीड लाख लाभार्थ्यांची नोंद झाली आहे", असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Eknath Shinde
BJP-Shivsena Dispute : भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी; फडणवीसांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा, काय घडलं?

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आता ड्रोनच्या माध्यमातून तीन मिनीटात एक एकर शेत फवारून होणार आहे. यापुढे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत. आमच्या सरकारने राज्यात २९ सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. पण याआधिच्या सरकारने एकही सिंचन प्रकल्प मंजूर केला नव्हता. आता जवळपास सात लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", असंही त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde
Shinde Group MLA News : शिंदे गटाच्या आमदाराने खा खा खाल्ले अन्‌ ४० हजारांचे बिल पाहून कॅन्टिनचालकावरच भडकले

दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे नवीन सुधारित दराने मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.

तसेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या योजनांची यादीच यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. यामध्ये 'लेक लाडकी', नमो शेतकरी सन्मान योजना, यासह अजून काही योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com