Satyajit Tambe News : आमदार तांबेंचा राज्य सरकारला सज्जड इशारा

Satyajit Tambe Andolan : सरकारने शिक्षणावर खासगीकरण, कंत्राटीकरण असे वेगवेगळे प्रयोग करत शिक्षणाची प्रयोगशाळा करून टाकली आहे.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangamner News : सरकारने शिक्षणावर खासगीकरण, कंत्राटीकरण असे वेगवेगळे प्रयोग करत शिक्षणाची प्रयोगशाळा करून टाकली आहे. या प्रयोगांवरून नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे राज्य सरकारवर कडाडले आहेत. शिक्षणात चुकीचे धोरण राबवू नका, असा सज्जड इशारा देत शिक्षणातील खासगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात संगमनेरमध्ये काढलेल्या विराट मार्चात आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटीकरण, समूह शाळा अशा वेगवेगळ्या निर्णयांविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, प्राचार्य हिरालाल पगडाल, प्रा. भाऊसाहेब चासकर, छात्र भारतीचे अनिकेत घुले यांच्यासह दहा हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे प्रांताधिकारी कार्यालय दणाणले होते.

Satyajit Tambe News
Sangli Loksabha Election : सांगली लोकसभेत डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू; चंद्रहार पाटलांची घोषणा

आमदार तांबे म्हणाले, "शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने (State Government) शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने थांबवावी, अन्यथा मुंबईपर्यंत धडक मोर्चा काढण्यात येईल."

माजी आमदार तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनीदेखील शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी अनेक चुकीचे निर्णय सध्याचे सरकार घेत आहे. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. आदिवासी-वाडी वस्तीवरील शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा घाट म्हणजे राज्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

त्यामुळे सरकारने तातडीने हे निर्णय रद्द करावेत, अशी मागणी केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचाही या मोर्चाला पाठिंबा असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Satyajit Tambe News
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगरमध्ये प्रचाराआधीच कोट्यवधींचा चुराडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com