Sangli Loksabha Election : सांगली लोकसभेत डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू; चंद्रहार पाटलांची घोषणा

Chandrahar Patil : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगली जिल्ह्यातील विट्यासह अनेक ग्रामीण भागात दौरेही केले आहेत.
Sangli Loksabha Election :
Sangli Loksabha Election :Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : आगामी लोकसभेच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकला असताना आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलदेखील मैदानात उतरले आहेत, पण या वेळी ते कुस्तीच्या नव्हे तर निवडणुकीच्या मैदानात उतरून पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. चंद्रहार पाटील यांनी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangli Loksabha Election :
Tembhu Water Issue : टेंभू पाणी योजनेवरून सांगलीत राजकारण तापलं; संजय पाटील-सुमन पाटील आमने-सामने

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून मला ऑफर्स येत आहेत, तर मी ही लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे, असे सांगत चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या आखाड्यात लांघ बांधून तयार असल्याचे दाखवून दिले आहे. मी लोकसभा लढवावी, अशी जिल्ह्यातील अनेकांची इच्छा आहे. मीही लोकसभा लढण्यास तयार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगली जिल्ह्यातील विट्यासह अनेक ग्रामीण भागात दौरेही केले आहेत. हे दौरे करतानी लोकांच्या भावनाही जाणून घेत आहेत.

...तर सांगलीत तीन पाटलांमध्ये लढत

सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन पाटलांमध्ये लढत होणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसकडून विशाल पाटील आणि भाजपकडून संजय पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, तर पृथ्वीराज देशमुख यांनीदेखील भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यात चंद्रहार पाटील यांनीही आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आता तीन पाटलांची निवडणुकीच्या आखाड्यात लढत होणार का, अशीही सांगतील चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Sangli Loksabha Election :
Gadkari On Caste Wise Census : जनतेच्या नव्हे तर पुढाऱ्यांच्या मनात असते जात; जातीनिहाय जनगणनेला गडकरींचा विरोध !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com