
Nandgaon Shivsena News : नांदगाव मतदारसंघ हे माघे घर आहे. सध्याच्या दुष्काळी स्थितीतही कोणालाही वाऱ्यावर न सोडता त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन दुष्काळाचा यशस्वी मुकाबला करून त्यावर मात करू, असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला. (Shivsena MLA Suhas Kande assures partyworkers for drought relief)
नांदगाव (Nandgaon) मतदारसंघातील कळवाडी जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार कांदे यांनी मतदारसंघावर ओढावलेली दुष्काळाची परिस्थिती पाहता नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केल्याचे सांगितले.
यासंदर्भात रुग्णवाहिकेचे श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. नागरिकांसाठी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतूने रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.
आमदार कांदे यांनी आपल्या वाढदिवशी दहा पाण्याचे टँकर , १०१ दिव्यांगांना सायकल वाटप, मोफत फिरता दवाखाना, मोफत रुग्णवाहिका, वैकुंठ रथ तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बस या सुविधा उपलब्ध केल्या होत्या.
कळवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर कांदे, दिनकर महाले, साहेबराव नरवाडे, रोहित जाधव, बाळू बोरा, प्रदीप देसले, विजय इप्पर, संजय देसले, विनोद सोनजे, राकेश अहिरे, जगदीश जालम, प्रशांत देसले, हेमंत देसले अनिल देसले, चैत्राम माळी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.