Maharashtra Drought Politics : शिवसेनेने आमदार कांदेच्या जखमेवरील खपल्याच काढल्या!

MLA Suhas Kande in Trouble, Shivsene Thackeray Group aggressive on Drought issue-सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर प्रशासनाला जबाबदार धरले होते.
Shivsena Morcha at Nandgaon
Shivsena Morcha at NandgaonSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Government : नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने सत्ताधारी गटाचे आमदार कांदे यांनी प्रशासनाला दोषी ठरवले होते. मात्र, विरोधकांनी प्रशासनाला चुचकारत थेट आमदारांनाच लक्ष्य केले आहे. (NCP & Shivsena came togather on Nandgaon Drought issue against Suhas Kande)

मराठा आरक्षणाच्या (Maratha) विषयावर नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील राजकारण आक्रमक बनले होते. त्यात सत्ताधारी आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनीही (Shivsena) थेट राज्य सरकारला लक्ष्य केले होते. हे वातावरण निवळण्याआधीच नांदगावमध्ये दुष्काळाचे राजकारण सुसाट निघाले आहे.

Shivsena Morcha at Nandgaon
Maharashtra Politics : महायुतीच्या आमदारांची ‘वर्षा’वर खलबतं; मुख्यमंत्री देणार कानमंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत कालपासून उपोषण सुरू केले होते. आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते गणेश धात्रक यांनी मोठा मोर्चा काढत सबंध तालुक्यात वातावरण तापवण्यास सुरुवात केली. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे सत्तेत असूनदेखील आमदार मतदारसंघातील नागिरकांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यांची तहान भागवू शकत नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागल्याचा आरोप धात्रक यांनी केला.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगाव नसल्याने त्याची झळ थेट शेतकरी, नागरिकांना बसणार आहे. या भागात अतिशय गंभीर स्थिती आहे. सातत्याने दुष्काळाचा सामना केलेल्या या तालुक्याला त्याचा अनुभव आहे. त्यामुळेच सर्वच सत्ताधारी, विरोधक व अन्य संघटना याविषयावर अतिशय संवेदनशील असतात. आमदार कांदे स्वतः याविषयी केलेल्या कामांमुळे प्रकाशझोतात आलेले होते.

या सर्व राजकारणात दुष्काळाच्या यादीत नांदगाव नसल्याचे खापर प्रशासनावर फोडण्यात येत होते. प्रशासनानेदेखील हा आरोप पुसण्याचे काम सुरू केले होते. मात्र, तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रशासनाने काम करावे. त्यांच्या स्तरावर काम होत आहे, अशी अप्रत्यक्ष पाठराखन विरोधकांकडून झाली आहे. उपोषणाचा सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेसने नेमक्या विषयावर बोट ठेवत कोंडी केली. यामध्ये आमदार कांदे राजकारणाची कोणती कांडी फिरवतात, याची उत्सुकता आहे.

Shivsena Morcha at Nandgaon
Supriya Sule Letter To Om Birla : खासदार सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com