Nashik MNS : नाशिक पश्चिममध्ये 1 लाख 12 हजार बोगस मतदार ; मनसेचं शिष्टमंडळ पेनड्राईव्ह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे

MNS exposes 1.12 lakh bogus voters in Nashik West : नाशिक मध्ये पत्ते नसतानाही एक लाख मतदारांची नोंदणी कशी असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
MNS officials from Nashik West submitting a pen drive containing data of 1.12 lakh alleged bogus voters to the District Collector.
MNS officials from Nashik West submitting a pen drive containing data of 1.12 lakh alleged bogus voters to the District Collector.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मतदार यादीतील घोळाविरोधात मुंबईत १ नोव्हेंबरला विरोधकांतर्फे निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा 'न भूतो न भविष्यती' असा झाला पाहिजे यासाठी तयारीला लागा अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत. त्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांकडून मतदार यांद्यामधील कथित घोळ बाहेर काढले जात आहेत.

आता नाशिक पश्चिम मतदारसंघात १ लाख १२ हजार मतदारांचा घोळ झाल्याची तक्रार मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मनसेच्या या आरोपनंतर मतदारसंघात देखील खळबळ उडाली आहे. या घोळाबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्ये मोठ्या स्वरुपाचा घोळ झाला असून एक लाख १२ हजार मतदारांचा घोळ आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पेन ड्राइव्हद्वारे पुरावे सादर केले.

पश्चिम या एकाच मतदारसंघात एक लाख १२ हजार मतदारांचा घोळ व तफावत आढळते. एक लाख मतदारांचे पत्तेच आढळले नाही. पत्ते नसताना निवडणूक आयोगाने मतदारांची नोंदणी कशी केली असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

MNS officials from Nashik West submitting a pen drive containing data of 1.12 lakh alleged bogus voters to the District Collector.
Heena Gavit Join BJP : तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढल्या, हिना गावित यांची आता पुन्हा भाजपमध्ये घरवापसी

त्यामध्ये १२ हजार बोगस व दुबार मतदार आहेत. तसेच फॉर्म क्रमांक ५ व फॉर्म क्रमांक ६ चा गैरवापर करून नोंदणी केलेले; पण वास्तव्यस नसलेले मतदार, महाराष्ट्राबाहेरील राज्यात वास्तव्यास असलेले मतदार मोठ्या प्रमाणात सापडले. त्यामुळे संबंधित मतदारसंघातील यादीमधील घोळ लक्षात घेता बोगस मतदार वगळून यादी सदोष करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

MNS officials from Nashik West submitting a pen drive containing data of 1.12 lakh alleged bogus voters to the District Collector.
Eknath Khadse : धक्कादायक, पेट्रोलपंपानंतर एकनाथ खडसेंच्या घरावरही चोरट्यांचा डल्ला ; सगळी कपाटं फोडून अंगठ्या, रोकड लंपास

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना यांदर्भात निवेदन देताना, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सचिव संदेश जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com