MNS Politics: उद्धव ठाकरेंच्या आधी मनसे साधणार संधी !

Political News : काळाराम मंदिरातील दर्शनाच्या उपक्रमात आता 'मनसे'नेही उडी घेतली असून 51 हजार लाडू वाटप करणार.
Ram Mandr, Klaram temple
Ram Mandr, Klaram temple Sarkarnama
Published on
Updated on

Shri Ram Mandir temple politics: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपने त्यात उडी घेतली. आता 'मनसे'ही काळाराम मंदिरात कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे काळाराम मंदिराच्या दर्शनावरून राजकारण रंगले आहे.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे. त्याला उत्तर म्हणून शिवसेनेने पक्षप्रमुख ठाकरे त्याच दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतील. तसेच रामतीर्थावर गोदावरी आरती करतील, अशी घोषणा केली होती. त्यावरून बरेच राजकारण तापले. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांच्या आधीच पंतप्रधान मोदी (Narendar modi) यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन पूजा केली. आता यामध्ये मनसेने देखील ठाकरे येण्याच्या दिवशीच व त्यांच्या आधी सकाळी काळाराम मंदिरात दर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे.

Ram Mandr, Klaram temple
Ahmednagar Breaking News : नगर जिल्हा 'हाय अलर्ट'वर; जरांगे,भुजबळांच्या सभांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासंदर्भात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक येथे दिवाळी साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसेचे नेते व माजी महापौर अशोक मुर्तडक विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात सकाळी नऊला दर्शन व पूजन करतील. यावेळी 51 हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंध शहरात विविध कार्यक्रम करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये पंचवटी अशोक स्तंभ नाशिक रोड देवळाली गाव सातपूर पाथर्डी सीबीएस शालिमार यांसह शहराच्या विविध प्रमुख भागांमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नागरिकांना लाडू वाटप आणि विविध कार्यक्रम करण्याचे जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शनिवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात राजगड येथे लाडू बनविण्याच्या कार्यक्रमाला श्री मुर्तडक यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम, पराग शिंत्रे, अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अक्षरा घोडके, आरती खिराडकर, शैला शिरसाठ, मीरा आवारे, अश्विनी बैरागी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

(Edited by : Sachin Waghmare)

Ram Mandr, Klaram temple
Nashik Kalaram Mandir : देशात अयोध्या, तर महाराष्ट्रात 'काळाराम' केंद्रस्थानी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com