Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी निफाडमध्ये होणार मोदींची प्रचारसभा!

Nashik and Dindori Lok Sabha constituencies : सभा यशस्वी करण्यासाठी भाजप नेत्यांनी ठोकला निफाडमध्ये तळ
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Loksabha Mahayuti News: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (ता. 15) सभा होत आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविषयी शेतकऱ्यांचा आक्रोश असलेल्या भागात ही सभा होत आहे. त्यामुळे सभा यशस्वी करण्यासाठी भाजपची यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि अजित पवार तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन हे प्रमुख नेते उपस्थित असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Shirdi Lok Sabha Constituency : 'वंचित'मुळे दोन्ही शिवसेना टेन्शनमध्ये; पैजांचा भाव वाढला!

महायुतीच्या प्रचाराच्या दृष्टीने पाचव्या टप्प्यातील मतदान असलेल्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी पंतप्रधान मोदी(PM Modi) यांची बुधवारी दुपारी पिंपळगाव बसवंत (निफाड)येथे सभा होत आहे. सभा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची मोठी टीम नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. हे पदाधिकारी प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्याच्या संपर्कात आहेत.

महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे खास नियोजन करून ही सभा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सभा यशस्वी करण्यासाठी मोठा दबाव आहे. एक लाख लोक सभेला जमावेत असे नियोजन भाजपने केले आहे.

Narendra Modi
Dindori Lok Sabha: मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे यांच्या हस्तक्षेपाने दिंडोरीची यंत्रणा गतिमान

दिंडोरी मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच दिलीप बनकर, नितीन पवार, नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. याशिवाय चांदवड येथे डॉ राहुल आहेर आणि नांदगावला शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहेत. या प्रत्येक आमदारांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट देण्यात आले आहे.

भाजपचे पदाधिकारी स्वतंत्रपणे काम करणार आहे. यामध्ये प्रत्येक बूथला दोन वाहने भरून गर्दी आणण्याचे टार्गेट आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात ३८०० बुथ आहेत. त्यानुसार नियोजन यशस्वी झाल्यास किमान ८० हजार लोक सभेला जमतील असा अंदाज आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी या सभेसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. आज सायंकाळी बावनकुळे तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल होत आहेत. आमदार श्रीकांत भारतीय, विजय साने, उमेदवार डॉक्टर भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांसह विविध नेते उद्याच्या सभेसाठी नियोजन करीत आहेत.

Narendra Modi
Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये राजकारण पेटले; महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिकमध्ये सातत्याने तालुका निहाय पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात होणारी ही सभा अयशस्वी झाल्यास त्याचा वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नेत्याशी भाजपचे पदाधिकारी व्यक्तिशः चर्चा करून त्याची जाणीव करून देत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com