Shirdi Lok Sabha Constituency : 'वंचित'मुळे दोन्ही शिवसेना टेन्शनमध्ये; पैजांचा भाव वाढला!

Maharashtra Lok Sabha Election 2024 : शिर्डीच्या निवडणुकीत वेगळाच रंग भरला. सुरूवातीला दुरंगी वाटत असलेली लढत उत्कर्षा रुपवते यांनी 'वंचित'कडून घेतलेल्या एन्ट्रीमुळे तिरंगी झाली. यातच मतदानाचा टक्का यंदा घसरला आहे.
Shirdi Lok Sabha Constituency
Shirdi Lok Sabha ConstituencySarkarnama

Nagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने विद्यमान उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे. यातच 'वंचित'चा तडाखा कोणाला बसणार की, 'वंचित' बाजी मारणार, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. यातूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पैजा सुरू झाल्या आहेत. वंचितमुळे पैजांचा भाव वाढला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.54 टक्के मतदान झाले होते. यंदा यात दीड टक्का मतदान घसरले जाऊन 63.03 टक्के मतदान झाले. घसरलेले मतदान कोणाचे, वंचितच्या एन्ट्रीचा तडाखा कोणाला बसणार, अशी चर्चा आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लढत होईल, असे सुरूवातीला चित्र होते. परंतु काँग्रेसकडून नाराज झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे शिर्डीच्या निवडणुकीत वेगळाच रंग भरला. सुरूवातीला दुरंगी वाटत असलेली लढत उत्कर्षा रुपवते यांनी घेतलेल्या एन्ट्रीमुळे तिरंगी झाली. यातच शिर्डीत मतदानाचा टक्का यंदा घसरला आहे. प्रस्थापितांच्या राड्यात वंचित बाजी मारणार, अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय पैजा सुरू झाल्या आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirdi Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha: मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे यांच्या हस्तक्षेपाने दिंडोरीची यंत्रणा गतिमान

शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी 2019 मध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले होते. यंदाही संगमनेरमध्येच सर्वाधिक मतदान झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून 65.77 टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून 64.08 टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडातील काँग्रेसचे आमदार आहेत. संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात तर, श्रीरामपूरमध्ये आमदार लहू कानडे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथून कोणाला सर्वाधिक लीड मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेर आणि श्रीरामपूर पाठोपाठा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून 63.77 आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून 61.18 टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आहे. कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे आहे. याशिवाय कोपरगावमध्ये भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे वर्चस्व आहे. स्नेहलता कोल्हे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर मंत्री विखेंवर नाराज आहेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्नेहलता कोल्हे यांच्या नाराजीची दखल घेतली. यानंतर तरी कोपरगाव कोणाला लीड देणार याची उत्सुकता आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
Pune City Hording News : शहरातील 5 हजार होर्डिंगचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर !

नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात 63.29 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांपेक्षा भाजप नेत्यांचे दौरे अधिक झाले. शिवसेना उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील या मतदारसंघात निवडणुपूर्वी प्रचारावर सर्वाधिक भर दिला होता. असे असले, तरी शंकरराव गडाख यांनी ठाकरे पक्षाच्या उमेदवारा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसाठी देखील ताकद पणाला लावली. त्यामुळे येथून सर्वाधिक कोणाला मतदान मिळेल, याचा पैजा लागल्या आहेत.

Shirdi Lok Sabha Constituency
Nagar Lok Sabha : नगर दक्षिणची निवडणूक विखे कोर्टात घेऊन जाणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा

आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाचा आमदार डाॅ. किरण लहामटे आहेत. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. 59.82 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे कटवड शिवसैनिक आहेत. तसेच शरद पवार आणि अजित पवारांना मानणार सर्वात जास्त कार्यकर्ते आहेत. याशिवाय काॅंग्रेस ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे देखील या तालुक्यात वर्चस्व आहे. या अटीतटीच्या लढतीत हा तालुका कोणाच्या मागे उभे राहिला, हे मतमोजणीनंतर लक्षात येईल.

Shirdi Lok Sabha Constituency
Chhatrapati Sambhajinagr Constituency : संभाजीनगरात शिवसेनाच.. पण बाळासाहेबांची की उद्धव ठाकरेंची ?

विधानसभा मतदारसंघानिहाय आकडेवारीत मतदान

अकोले 1 लाख 55 हजार 930, संगमनेर 1 लाख 84 हजार 031 , शिर्डी 1 लाख 78 हजार 716, कोपरगाव 1 लाख 71 हजार 059, श्रीरामपूर 1 लाख 93 हजार 605 आणि नेवासा 1 लाख 73 हजार 957, असे मतदान झाले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Shirdi Lok Sabha Constituency
Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी निफाडमध्ये होणार मोदींची प्रचारसभा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com