PM Narendra Modi : नाशिकमधून मोदींनी पुन्हा ठाकरे- पवारांना डिवचलं; 'नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना काँग्रेसमध्ये...'

Nashik Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यांचं मतदान नुकतेच पार पडले.आता पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे.त्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह नाशिक, दिंडोरी, धुळे मतदारसंघाचाही समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. या सभेत मोदींनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , शरद पवारांना डिवचलं आहे.

Narendra Modi
Pune Loksabha : 'कँटोन्मेंट'ची साथ ठरवणार पुण्यात धंगेकर की मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. या सभेत मोदींनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीकेची झोड उठवली. नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं विधान करत पुन्हा एकदा डिवचलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी म्हणाले, बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाला तोडले. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते अयोद्धा राममंदिर,जम्मू कश्मीर 370 रद्द होते. पण या सगळ्याच्या जास्त चिडी नकली शिवसेना होत आहे.काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा निमंत्रणाला नाकारले तेच नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला.नकली शिवसेनावाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन फिरत आहे, जे काँग्रेस वीर सावकरांना शिव्या देत आहे. पण आता राष्ट्रभक्त जेव्हा हे बघते तेव्हा महाराष्ट्रातील लोकांचे राग आहे.

नकली शिवसेनाला (Shivsena) इतका अहंकार वाढला आहे की, लोकांच्या रागाशी त्यांना देणंघेणं नाही.चार टप्प्यांत चारही बाजूंनी लोकांनी त्यांना चीत केले आहे. मोदी गरीब को मुफ्त राशन देत आहे. गरीबाला पक्के घर देत आहे. वीज कनेक्शन, हर घर जल, हमने कधीच कोणाचा धर्म बघितला नाही. सगळ्याना योजनांचा लाभ देतो असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi
Local Self-Government News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आशेने इच्छुक कंगाल, वर्गणी देऊन झोळी झाली रिकामी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com