निकालानंतर भाजप उमेदवाराच्या झटापटीत मोहिनी जाधव यांचा मृत्यू!

आरोपींना अटकेच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या
Shivsena workers at Sakri Police station
Shivsena workers at Sakri Police stationSarkarnama
Published on
Updated on

साक्री : नगरपंचायत (Dhule) निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हाणामारीच्या घटनेतील संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेत नातेवाईकांनी गुरूवारी मोहिनी जाधव यांचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणला. यावेळी चर्चेअंती पोलिसांनी लेखी अश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला.

Shivsena workers at Sakri Police station
जितेंद्र आव्हाडांचा बॅाम्ब; नाशिक महापालिकेत ७०० कोटींचा घोळ!

बुधवारी सायंकाळी निकालानंतर भाजप पदाधिकारी आणि प्रभाग ११ मधील पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांचा मुलगा गोटू ऊर्फ रवींद्र जगताप यांच्यात हाणामारीची घटना घडली होती. या दरम्यान मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रात्री उशिरा मोहिनी यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून आठ ते नऊ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरूवारी धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मोहिनी जाधव यांचा मृतदेह सायंकाळी साक्री येथे आणला असता नातेवाईकांनी तो स्विकारण्यास नकार देत थेट पोलिस ठाण्याच्या आवारात आणला.

Shivsena workers at Sakri Police station
अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजात नैराश्य आले

संशयितांना तत्काळ अटक करावी, त्यानंतरच मृतदेह स्वीकारू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे दोन ते तीन तास मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात होता. यावेळी पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेअंती सात दिवसांत संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी अश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या सर्व प्रकरणामुळे गुरूवारीही शहरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असून, सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर नागरे, अरविंद भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे, नगरसेवक सुमित नागरे यांच्यासह भटके-विमुक्त समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, धुळे येथील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी धुळे येथील भाजपच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यासह आणखी संशयितांचीही नावे यात घेतली जावीत, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, या प्रकरणात जखमी असलेले गोटू उर्फ रवींद्र जगताप यांच्या जबाबानंतरच अन्य संशयितांची नावे यात येतील व सर्वांवर कारवाई केली जाईल, असे अश्‍वासन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बच्छाव यांनी या वेळी दिले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com