Mumbai Fraud News : भाजप नेते आशिष शेलारांच्या नावे फसवणूक, दोन जणांना अटक

Mumbai Crime News : प्रसिद्ध काॅलेजमध्ये विद्यार्थ्याला अॅडमिशन देण्याच्या नावाखाली फसवणूक...
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या नावाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

Ashish Shelar
Karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटक दौरा रद्द ; फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले..

या प्रकरणी तक्रारदाराने वांद्रे पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव अग्रवाल (22) व दीप वेद (29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Ashish Shelar
Sanjay Raut : '' आधी राजभवनात जा अन् चहा, बिस्कीटं न घेता राज्यपालांना कारे करा...''

प्रसिद्ध काॅलेजमध्ये विद्यार्थ्याला अॅडमिशन देण्याच्या नावाखाली आरोपींनी ही फसवणूक केली आहे. अॅडमिशनसाठी आरोपींनी आशिष शेलारांचे (Ashish Shelar) बनावट लेटरहॅड व त्यावर बनावट डिजीटल सहीही केली. या लेटरच्या मदतीने आरोपींनी 1 लाख 30 हजार उकळले असल्याचे तपासात समोर आले आहे. शेलारांच्या नावे देण्यात आलेल्या शिफारस पत्राची खात्री करताना हे लेटर बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com